कुर्ती अन् टीशर्टवर लेगिंग्सचा ट्रेण्ड आहे In, पण 'या' टिप्स वापराल तर लेगिंग्स जास्त काळ टिकतील
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 04:50 PM2022-02-04T16:50:26+5:302022-02-04T16:55:02+5:30
योग्य देखभाल केल्याने, लेगिंग्ज बऱ्याच काळासाठी वापरली जाऊ शकते. खरेदीनंतर काही दिवसांनी बहुतेक लेगिंग्ज सैल होतात. अशा परिस्थितीत लेगिंग्ज खरेदी केल्यानंतर थोडी अधिक काळजी घ्या. यामुळे तुमचे लेगिंग्ज लवकर खराब होणार नाही आणि पैशाची बचतही होईल.
प्रत्येकाला आरामदायक कपडे घालायला आवडतात. आजकाल कुर्तीसह लेगिंग्ज आणि टी-शर्ट घालण्याचा ट्रेंड खूप आहे. आपण कितीही महागडे लेगिंग्ज खरेदी केले तरी काही काळानंतर ते खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत लोकांची मानसिकता अशी बनली आहे की लेगिंग्ज लवकर खराब होतात. पण ते तसे नाही. योग्य देखभाल केल्याने, लेगिंग्ज बऱ्याच काळासाठी वापरली जाऊ शकते. खरेदीनंतर काही दिवसांनी बहुतेक लेगिंग्ज सैल होतात. अशा परिस्थितीत लेगिंग्ज खरेदी केल्यानंतर थोडी अधिक काळजी घ्या. यामुळे तुमचे लेगिंग्ज लवकर खराब होणार नाही आणि पैशाची बचतही होईल.
लेगिंग्ज सतत धुवू नका
वारंवार धुण्यामुळे लेगिंग्स सैल होतात. वास्तविक ते नायलॉन आणि कॉटन फॅब्रिक मिक्स करून बनवले जाते. त्यामुळे ते धुताना काळजी घ्यावी. ते धुताना जास्त घासण्याची गरज नाही. मशीनऐवजी हाताने धुणे चांगले. लेगिंग्जची चमक टिकवून ठेवण्यासाठी, ते नेहमी उलटे धुवा आणि वाळू घ्याला.
फॅब्रिक सॉफ्टनर वापरू नका
लेगिंग्जची चमक टिकवण्यासाठी फॅब्रिक सॉफ्टनरचा वापर टाळावा. फॅब्रिक मऊ ठेवण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. यासाठी थंड पाण्यात व्हिनेगर टाका आणि लेगिंग्ज अर्धा तास भिजवून ठेवा. असे केल्याने त्याची गुणवत्ता आणि चमक दोन्ही राहते.
वाळवण्याची पद्धत
बरेच लोक इतर कपड्यांप्रमाणे कडक उन्हात लेगिंग्ज सुकवतात किंवा तेव्हा ड्रायरचा वापर करतात. अशी चूक करू नका. ड्रायरच्या उष्णतेमुळे लेगिंग लवकर झिजतात. त्यात छिद्रे होऊ लागतात. त्यामुळे लेगिंग्स नेहमी जास्त उन्हात वाळू न घालता सावलीमध्ये नेहमी वाळू घ्याला.