Fashion Tips : उन्हाळ्यात स्टायलिश दिसायचयं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2017 10:51 AM2017-04-11T10:51:33+5:302017-04-11T16:21:33+5:30
उन्हापासून रक्षणाबरोबरच स्टायलिश दिसण्यासाठी वापरा या टिप्स !
Next
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून राज्याचा पारा ४५ अंशावर गेला आहे. सर्वत्र उन्हाचा कडाका आहे. या परिस्थितीमध्ये घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत ज्यामुळे आपले घराबाहेरही उन्हापासून रक्षण होईल शिवाय आपण स्टायलिश दिसू, असा प्रश्न आपणास पडला असेल तर आज आम्ही आपणास काही टिप्स देत आहोत, ज्या फॉलो केल्यास नक्कीच फायदा मिळेल.
आपण उन्हापासून बचावासाठी शीतपेय, आइसक्रीम, नारळपाणी, नाक्यावरचा बर्फाचा गोळा अगदी चवीने खातो. मात्र याबरोबरच उन्हाळ्यात कपड्यांचीही निवड योग्य असायला हवी. वाढत्या तापमानाचा अंदाज घेता आपल्या कपड्यांबाबतच्या सवयींमध्ये बदल करणे गरजेचे आहे. बाजारातही उन्हाळ्यासाठी खास असे कपडे आले आहेत. घराबाहेर पडताना कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत याबाबत जाणून घेऊया.
खादी शर्ट व सदरा
दिसण्यास रेखीव व उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी खादी शर्ट व सदराचा वापर तरुण मुला-मुलींपासून ते वयोवृद्धांनी करायला हरकत नाही. बाजारामध्ये या शर्ट व सदऱ्याची किंमत ४०० ते ८०० पर्यंत आहे.
कॉटन सदरा
बहुतेक मुली स्टायलिश दिसण्यासाठी कॉटनच्या सदराचा वापर करतात. शिवाय या कुर्तामधून हवा खेळती राहते. त्याचप्रमाणे हा कुर्ता आपण समारंभ व इतर ठिकाणी घालू शकता. यामध्ये प्रिंटेड व प्लेनसुद्धा उपलब्ध आहेत. याची किंमत ५०० ते १००० पर्यंत आहे.
गुंजी
उन्हाळ्यात बाहेर फिरण्याचे प्लॅन होत असतात त्या वेळी याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये तुम्ही बदलही करू शकता.. कॉटनपासून याची निर्मिती होत असल्याने उन्हापासून तुमचे संरक्षण होऊ शकते. याची किंमत ५०० ते ७०० पर्यंत आहे.
टॉप-धोती फ्युजन
टॉप व धोती याचं हे संयोजन आहे. बाजारामध्ये विविध रंग व प्रकारांत उपलब्ध आहे. याची किंमत बाजारात ६०० ते १२०० पर्यंत आहे.
फ्लेअर पँट्स
बेल बॉटम असा याचा पायजमा आहे. काळानुसार लुप्त झालेला हा प्रकार नव्याने बाजारात आला आहे. दिसण्यास आकर्षक व मॉडर्न टच देऊन त्याची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारात याची किंमत ५०० ते ७०० आहे.