ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीजची फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2016 09:50 AM2016-08-31T09:50:09+5:302016-08-31T15:20:09+5:30

तरुणींना जसे वेगवेगळ््या आऊटफिट्सचे वेड असते. तसेच त्यांना डिफरंट ज्वेलरी ट्राय करायलाही आवडतात. सध्या ट्रेंडी, मॉर्डन दागिन्यांची फॅशन असल्याचे दिसून येते. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल कोणत्याही लुकवर मॅच होणारे इयरिंग्ज आणि नकलेस अगदी सहजपणे मिळतात. पण ज्वेलरी फक्त कपड्यांवर सूट होऊन चालत नाही. तर तुमच्या चेहºयादेखील ती साजेशी वाटली पाहिजे. प्रत्येकाच्या चेहºयाचा आकार वेगळा असतो. म्हणूनच कोणत्या चेहºयाला कोणती ज्वेलरी जास्त खुलून दिसू शकते आपण पाहुयात...

Fashion of trendy accessories | ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीजची फॅशन

ट्रेंडी अ‍ॅक्सेसरीजची फॅशन

Next
class="adn ads" style="padding-bottom: 20px; border-left: 1px solid transparent; padding-left: 4px; color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: medium; line-height: normal;">
 
प्रियांका लोंढे
       तरुणींना जसे वेगवेगळ््या आऊटफिट्सचे वेड असते. तसेच त्यांना डिफरंट ज्वेलरी ट्राय करायलाही आवडतात. सध्या ट्रेंडी, मॉर्डन दागिन्यांची फॅशन असल्याचे दिसून येते. वेस्टर्न आणि ट्रॅडिशनल कोणत्याही लुकवर मॅच होणारे इयरिंग्ज आणि नकलेस अगदी सहजपणे मिळतात. पण ज्वेलरी फक्त कपड्यांवर सूट होऊन चालत नाही. तर तुमच्या चेहºयादेखील ती साजेशी वाटली पाहिजे. प्रत्येकाच्या चेहºयाचा आकार वेगळा असतो. म्हणूनच कोणत्या चेहºयाला कोणती ज्वेलरी जास्त खुलून दिसू शकते आपण पाहुयात... 
 
इयरिंग्ज
 
आयताकृती चेहरा
आयताकृती चेहºयावर स्टड्स किंवा कानाला चिटकून असणारे झुमके छान दिसतील. टिपीकल स्टडऐवजी मॉडर्न चंकी फंकी स्टड निवडा. बटनस्टाइल किंवा गोल कानातलेही आयताकृती चेहरा असणाºया तरुणींना उठून दिसतील. 
 
चौरसाकृती चेहरा
चौरसाकृती चेहरा असेल तर तो दिसायला फारच मोठा वाटतो. त्यामुळे अशा चेहºयावर  रुंद कानातले निवडण्यापेक्षा लांब कानातले जास्त सूट करतील. चौरसाकृती चेहरा असणाºया तरुणींनी चौकोनी आकार असलेले कानातले न वापरता लोंबते झुमके किंवा ड्राप निवडा. त्यामुळे स्क्वेअरसोडून एखादा वेगळा आकार ट्राय करून पाहू शकता. 
 
गोल चेहरा
गोल चेहºयाच्या मुलींनी टिपिकल गोल कानातले वापरणे टाळावे. जर तुम्हाला वेगळा आणि हटके लुक पाहिजे असेल तर लांब कानातले ट्राय करायला काहीच हरकत नाही.  कारण चेहरा लांब वाटण्यासाठी  लांब आणि पातळ कानातले घालायला हवे. झुमके आणि स्टड्स पेक्षा नव्या ट्रेंड मधील इयरिंग्ज वापरु शकता. ड्रॉप रिंग्स किंवा जरा वळलेले रिंग्सही छान दिसतील. 
 
नेकलेस
 
हार्ट शेप चेहरा
हार्ट शेप चेहरा असलेल्या महिलांची हनुवटी अरुंद असते. त्यामुळे चौकोनी  किंवा छोटे नेकलेस निवडल्याने असा चेहरा गोलाकार दिसू लागेल. गळ््याभोवती एखादी छोटी साखळी घातली तरी अशा चेहºयावर ती आकर्षक आणि उठून दिसते. 
 
लंबगोल चेहरा
लंबगोल चेहºयाच्या मुलींना खरेतर नशीबवानच म्हणायला हवे. कारण अशा चेहºयावर विविध आकार आणि प्रकारांची कानातली शोभून दिसतात. लंबगोल चेहºयाच्या महिलांना बरेच प्रयोग करायची संधीही मिळते. त्यांना लांब तसंच गळाबंद नेकलेसही ट्राय करता येतील. 
     
राऊंड शेप :
गोल चेहºयाच्या महिलांनी नेकलाईनच्या खाली येणारं नेकलेस निवडायला हवा. त्यांनी लांब, सरळ कानातली निवडायला हवीत. गोलाकार मण्यांचे दागिने गोल चेहºयाला शोभून दिसत नाही. चौकोनी, लंबगोल कानातल्यांमुळेही गोल चेहरा उठून दिसेल. टियरड्रॉप प्रकारची गोल कर्णभूषणे चेहºयाला सर्वाधिक शोभून दिसतील.
 

Web Title: Fashion of trendy accessories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.