​FASHION : हटके लुकसाठी 'ट्रॅडिशनल' ट्राय करा !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2017 12:59 PM2017-03-22T12:59:37+5:302017-03-22T18:29:37+5:30

रोजच जीन्स-टी शर्ट वापरुन बोअर झाले असाल तर हटके लुकसाठी कधीकधी पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार असे काहीतरी ट्रॅडिशनल ट्राय करा.

FASHION: Try 'Transitional' for a different look! | ​FASHION : हटके लुकसाठी 'ट्रॅडिशनल' ट्राय करा !

​FASHION : हटके लुकसाठी 'ट्रॅडिशनल' ट्राय करा !

Next
ong>-Ravindra More
रोजच जीन्स-टी शर्ट वापरुन बोअर झाले असाल तर हटके लुकसाठी कधीकधी पंजाबी ड्रेस किंवा चुडीदार असे काहीतरी ट्रॅडिशनल ट्राय करा. यामुळे तुमचा लुक चेंज होऊन आनंदी तर व्हाल शिवाय तुम्ही अधिक आकर्षक आणि स्टायलिश दिसाल. 

बऱ्याचदा आॅफिसला किंवा बाहेर फिरायला जायायचे असल्यास अनेक मुली ड्रेसची निवड करताना गोंधळात पडतात. आपल्या जवळ अनेक कपडे असतानाही कोणता ड्रेस घालूू? असा प्रश्न मनात घोंघावत असतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुली तेच ते कपडे पुन्हा पुन्हा वापरुन बोअर होतात. अशावेळी आपल्याकडे ठराविक कपड्यांऐवजी ट्रॅडिशनल कपड्यांचे कलेक्शनही असावे. कधीकधी ट्रॅडिशनल कपडे ट्राय केल्यास एकाच प्रकारचे कपडे वापरण्याचा कंटाळाही येणार नाही.

* साडीने महिलांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते, म्हणून कोणत्याही खास प्रसंगी साडी वापरण्यास संकोच करु नका. तुम्हाला अशी एकही महिला सापडणार नाही जिला साडी शोभून दिसत नाही.

* खास प्रसंगी परिधान केलेला अनारकली आपले सौंदर्य खुलवतो. आपल्या रंगानुसार आणि उंचीनुसार अनारकलीची निवड करा. यासाठी आपल्या वॉर्डरोबमध्ये एक अनारकली सूट अवश्य असावा. 

* काळ्या रंगाचा ड्रेस जो एलबीडी नावाने ओळखला जातो असा ड्रेस आपल्या वार्डरोबमध्ये असावा. कोणत्याही बांध्याला एलबीडी ड्रेस सुट करतो. फक्त आपल्या बांध्यानुसार आणि कम्फर्टनुसार ड्रेसची निवड करा.

Web Title: FASHION: Try 'Transitional' for a different look!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.