FASHION : फॅशनेबल होण्यासाठी वापरा हे दागिने !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 12:18 PM2017-02-02T12:18:30+5:302017-02-02T17:48:58+5:30
स्मार्ट लूक मिळविण्यासाठी चौकोनी हार, कानातील इअर कफ्स व चौकोनी हिऱ्याचे दागिन्यांचा वापर करते. याव्यतिरिक्त बरेच दागिने आहेत ज्यामुळे आपण अधिक फॅशनेबल दिसाल.
Next
आपण इतरांपेक्षा वेगळे, आकर्षक व फॅशनिस्ट दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी विशेष महिलावर्गाचा पुढाकार अधिक दिसून येतो. त्यासाठी प्रत्येक महिला स्मार्ट लूक मिळविण्यासाठी चौकोनी हार, कानातील इअर कफ्स व चौकोनी हिऱ्याचे दागिन्यांचा वापर करते. याव्यतिरिक्त बरेच दागिने आहेत ज्यामुळे आपण अधिक फॅशनेबल दिसाल.
फॅशनेबल दिसण्यासाठी कोणते दागिने वापराल?
गेल्या वर्षी पारइबा टूमलाइन, तंजानिट्स, लॅपिज लॅजुली अशा नवीन खडे व त्यांचे दागिने वापरले गेले. विशेष म्हणजे यात निळ्या रंगाचे खडे जास्त प्रचलित होते. रंगांविषयी माहिती व सूचना देणारी कंपनी पॅन्टॉनने या वर्षी हिरव्या रंगाची जादू कायम राहणार असल्याचे घोषित केले आहे. म्हणून तुम्ही पाचू, पेरिडोट्स जडलेले आभूषण घेऊ शकता.
या वर्षी छोट्या खड्यांचे पातळ दागिने प्रचलित असून पातळ बांगड्या, कंगन, छोटे चौकोनी हिरे, पाचू लावलेली अंगठी, पदक यांची फॅशन दिसून येत आहे. हिरा स्त्रियांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. हिरेजडीत कानातले, एकेरी कंगनही महिलांना खूप आवडते. चोकर हार सध्या पुन्हा फॅशनमध्ये आहे. लग्नात हिरेजडीत चोकर हार घालण्याचे चलन आहे. आपल्या कपड्यांशी जुळणारे हार सडपातळ मुलींनाही शोभून दिसतील.
२०१६ मध्ये खूप चाललेले इअर कफ्स यावर्षीदेखील विविध डिझाईन, आकार व लांबीमध्ये उपलब्ध राहतील. त्यांची जादू यंदाही कायम राहील.
यावर्षी सोनेरी, रोज गोल्ड हे रंग चालतील. हे रंग भारतीय महिलांच्या त्वचेवर उठून दिसतात. गुलाबी रंग बहुतांश स्त्रियांचा आवडता रंग असतो. दिवसा घालायच्या हिºयांच्या दागिन्यांवर हा रंग शोभून दिसेल.