उन्हाळ्यासाठी 'या' स्टायलिश वस्तू तुमच्या वॉर्डरोबमध्ये असाव्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:19 PM2019-03-27T19:19:33+5:302019-03-27T19:20:45+5:30
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तुमच्यासोबतच तुमचा वॉर्डरोबही तयार करा. बदलणाऱ्या वातावरणासोबत तुमचा वॉर्डरोब तयार करण्यासाठी तुम्हाला समर स्पेशल शॉपिंग करण्याची गरज आहे.
उन्हाळ्याला सुरुवात झाली असून वातावरणातील उष्णतेपासून बचाव करण्यासाठी तुमच्यासोबतच तुमचा वॉर्डरोबही तयार करा. बदलणाऱ्या वातावरणासोबत तुमचा वॉर्डरोब तयार करण्यासाठी तुम्हाला समर स्पेशल शॉपिंग करण्याची गरज आहे. अशातच उन्हाळ्यासाठी शॉपिंग करण्याबाबत तुमच्या मनात प्रश्न असतील तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही सहज शॉपिंग करू शकता.
समर स्कार्फ
रंगीबेरंगी समर स्कार्फ तुमच्या आउटफिट्सला आणखी आकर्षक करण्यासाठी मदत करतात. हे तुम्ही वेगवेगळ्या स्टाइल्समध्ये कॅरी करू शकता. कॅज्युअल जीन्स, टी-शर्टसोबत समर स्कार्फ स्टायलिश लूक मिळण्यासाठी मदत करतो. बाजारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कलर आणि प्रिंटमध्ये हा स्कार्फ मिळतो. तुम्ही सिल्क किंवा कॉटन स्कार्फ खरेदी कराल तर ते उत्तम ठरेल.
हॅट
सन प्रोटेक्शनसोबत हे तुम्हाला ट्रेन्डी लूक मिळण्यासाठी मदत करतो. आपल्या गर्ल गँगसोबत आउटिंग असो किंवा फॅमेलीसोबत कुठे बाहेर जायचं असेल तर नेहमी हॅटसोबत ठेवा.
क्लच
उन्हाळ्यामध्ये जड आणि मोठ्या हॅन्डबँग कॅरी करणं फार अवघड असतं. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या हॅन्डबॅग्सला बाय म्हणा आणि स्वतःसाठी एक क्लासी क्लच खरेदी करा.
सनग्लास
उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणामध्ये डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी सनग्लासेस उत्तम पर्याय ठरतो. उन्हापासून बचाव करण्यासाठी तुम्ही सनग्लासेसचा वापर करा. डोळ्यांचे आरोग्य राखण्यासोबतच स्टायलिश लूक मिळण्यासही मदत मिळते.