Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2017 08:15 AM2017-06-18T08:15:21+5:302017-06-18T13:45:21+5:30

आज फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना विशेष गिफ्ट द्या आणि त्यांच्यासाठी बनवा हा दिवस खास...

Father's Day Special: Give the Father the Most Joy in the World! | Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !

Father's Day Special : वडिलांना द्या जगातला परमोच्च आनंद !

Next
ong>-Ravindra More
असे म्हणतात की, एक वडील मुलीसाठी पहिला आदर्श असतो आणि मुलासाठी पहिला नायक. एक वडीलच आहेत जे मुलांना या जगात स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनवितात. यासाठी ते स्वत: खूप कष्ट सहन करुन आपल्या मुलांना जगभरातील सर्व आनंद देण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा आपण चुकतो तेव्हा  कधी आपले कान ताणून तर कधी मित्र बनून आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. ते संपूर्ण आयुष्य फक्त आपल्याच नव्हे तर आपल्या संपूर्ण परिवाराच्या आनंदासाठी न काही बोलता कठोर परिश्रम करतो.

तर चला मग आज फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना विशेष गिफ्ट द्या आणि त्यांच्यासाठी बनवा हा दिवस खास...

* त्यांना द्या आपली सोबत
प्रत्येक वडील आपल्या मुलांच्या उज्ज्वल भाविष्यासाठी कष्ट करतो. या धावपळीत ते एकटेच प्रयत्न करतात आणि व्यस्त असतात. ज्यामुळे ते आपल्या प्रेमापासून वंचित राहतात. तर आजच्या फादर्स डे निमित्ताने आपल्या वडिलांना भरपूर वेळ द्या, त्यांना समजून घा, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करा. यासाठी त्यांच्यासोबत काही खेळदेखील खेळू शकतात, शिवाय त्यांच्यासोबत एक शॉर्ट ट्रिपलाही जाऊ शकता.    

त्यांचे आवडते खाद्यपदार्थ बनवा
प्रत्येक वडिलांची आवडती स्पेशल डिश असते. आज वडिलांना आनंद देण्यासाठी त्यांच्या आवडीची डिश तयार करा. जर आपणास बनविता येत नसेल तर आपण आपल्या आईची किंवा बहिणीची मदत घेऊ शकतात. किंवा आपण आपल्या वडिलांच्या आवडत्या शॉपमधून त्यांची फेव्हरेट डिश आॅर्डर करु शकता. 

* एक आकर्षक घड्याळ गिफ्ट द्या
पुरुषांसाठी सर्वात प्रभावी गिफ्ट म्हणजे घड्याळ होय. यादिवशी आपण आपल्या वडिलांना एक आकर्षक गिफ्ट देऊ शकता. याने नक्कीच आपल्या वडिलांना आगळावेगळा आनंद होईल.  

* अविस्मरणीय अल्बम
जर आपल्याजवळ लहानपणींच्या आठवणींचे काही फोटो असतील ज्यात आपले वडील आपल्याला कुशीत घेऊन किंवा मांडीवर घेऊन खेळवत असतील असे काही फोटो एकत्र करु न एक उत्कृष्ट अल्बम तयार करुन आपल्या वडिलांना गिफ्ट देऊ शकता. हा अल्बम त्यांच्या आयुष्यात नक्कीच अविस्मरणीय अल्बम ठरेल.  

Also Read : ​​Father's Day Special : आयुष्यात वडिलांचे स्थान वेगळेच !

Web Title: Father's Day Special: Give the Father the Most Joy in the World!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.