फेरारीचे केले ‘काळीपिवळी’सारखे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2016 11:35 PM2016-04-03T23:35:41+5:302016-04-03T16:35:41+5:30
फेरारी एफ-40 मॉडेल कारच्या चाकांना साखळ्या लावून टपावर पट्ट्यांनी समाना बांधले आणि बर्फाळ डोंगरावर आडवीतिडवी गाडी चालविली.
Next
ब ईक आणि कार म्हणजे मुलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. त्यातल्या त्यात स्पोर्ट्स कार म्हणजे तर विचारूच नका. म्हणून तर ‘फेरारी’ म्हटले की एक आदर मनात निर्माण होतो.
आता फेरारी जरी विकत घेणे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारखे नसले तरी समजा की आयुष्यात एकदा फेरारी चालविण्याची संधी मिळाली तर तुम्ही ती कशी चालवणार?
लहान बाळाला कडेवर घेतल्यावर जितकी काळजी घेतली जाईल तेवढ्याच सावधानतेने फेरारीची राईड मारणार? बरोबर ना?
काळीपिवळी ट्रॅक्स चालविल्याप्रमाणे बेदरकपणे तर नाही ना चालविणार? पण काही महाभागांना ही गोष्ट कदाचित माहित नसावी किंवा त्यांना फेराराचे विशेष कौतुक नसावे.
त्यांनी फेरारी एफ-40 मॉडेल कारच्या चाकांना साखळ्या लावून टपावर पट्ट्यांनी समाना बांधले आणि बर्फाळ डोंगरावर आडवीतिडवी गाडी चालविली. बर्फावर चाक घसरताना ताना कारचे होणारे हाल पाहून कारपे्रमींच्या तर काळजाचा ठोका चुकेल.
आत तुम्हीच सांगा की, कोणी अशाप्रकारे ‘फेरारीची सवारी’ करेल काय? तुम्ही मात्र असे करू नका!