काही सेकंदात करा यूट्यूबवरुन व्हिडीओ डाऊनलोड !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2016 04:54 PM2016-12-22T16:54:38+5:302017-01-21T11:07:35+5:30
इंटरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय. अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली.
Next
इ टरनेटद्वारे व्हिडीओ पाहण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे यूट्यूब होय. अगोदर फक्त यूट्यूबवर व्हिडीओ फक्त पाहिले जायायचे. त्यानंतर आॅफलाईन सेव्ह करण्याची सुविधा आली. आता मात्र आपल्याला हवा तो व्हिडीओ अवघ्या काही सेकंदात डाऊनलोड करण्याची सोपी पद्धतही आली आहे. यासाठी सर्वप्रथम यूट्यूबवर जाऊन सर्च बारवर जा, आणि तुम्हाला हवा असलेला व्हिडीओ सर्च करा. यानंतर त्या व्हिडीओला ओपन करुन त्याच्या url वर जा. url मध्ये यूट्यूबच्या आधी ss टाईप करा व एंटर करा. उदाहरणार्थ, https://www.ssyoutube.com/watch?v=vUCM_0evdQY असे लिहा. एंटर केल्यावर तुमच्यासमोर Savefromnet ची विंडो ओपन होईल. ज्यामध्ये व्हिडीओ डाऊनलोड करण्याचा आॅप्शन दिलेला असेल. इथे तुम्ही कोणत्याही रिजोल्यूशनचा व्हिडीओ डाऊनलोड करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा की, इथे पूर्वनिर्धारित रिजोल्यूशनवरच व्हिडीओ डाऊनलोड करता येईल. दिलेल्या आॅप्शनपैकी तुम्ही सिलेक्ट करु शकता.