फिगर छान आहे, फॅशनचीही आवड आहे. मग बॉडीकॉन किंवा बॅण्डेज ड्रेस ट्राय करा ना..एकदम सेलिब्रिटीसारखा फील येईल! -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 04:13 PM2017-07-14T16:13:08+5:302017-07-14T16:13:08+5:30
तुम्ही फिगर कॉन्शस असाल आणि जर तुमची मेजरमेंट्स एकदम परफेक्ट असतील तर तुमच्यासाठी ‘बॉडीकॉन ड्रेसेस’ हा फॅशनकरीता एक उत्तम पर्याय ठरू शकेल.
मोहिनी घारपुरे-देशमुख
तुम्ही फिगर कॉन्शस असाल आणि जर तुमची मेजरमेंट्स एकदम परफेक्ट असतील तर तुमच्यासाठी ‘बॉडीकॉन ड्रेसेस’ हा फॅशनकरीता एक उत्तम पर्याय ठरू शकेल. विशेषत: नाईट आउट प्लान केला असेल तर एखादा सुंदरसा बॉडीकॉन ड्रेस घालून काही मीनिटातच तुम्ही तयार होवू शकता. विशेष म्हणजे तुमची फिगर हायलाईट करणारे हे ड्रेसेस अत्यंत सुंदर दिसतात.
साधारणत: 90 च्या दशकात हे ड्रेसेस फार लोकप्रिय झाले होते. उंच, सडपातळ बांध्याच्या अभिनेत्रींनी किमान एखाद्या तरी वेळी बॉडीकॉन ड्रेस घातल्याचं पाहायला मिळतं. 1920 मध्ये हे ड्रेसेस विशेषत्त्वानं समोर आले. तर 1930 ते 1970 या दरम्यान या ड्रेसेसची ओळख सुपर ग्लॅमरस फॅशन म्हणून झाली होती. विशेषत: 1980 च्या दशकात तर अभिनेत्री आणि ग्लॅमरस मानल्या जाणाऱ्या सर्व क्षेत्रातील महिला बॉडीकॉन ड्रेसेसच परीधान करताना दिसू लागल्या होत्या. त्याच दरम्यान फॅशन डिझायनर अझेदीन अलाईयाने किंग आॅफ क्लिंग नावानं महिलांच्या बॉडीकॉन ड्रेसेसचा एक मोठा ब्रॅण्डच बाजारात आणला. त्याचबरोबर पॅको रबाने नामक आणखी एका फॅशन डिझायनरनं याच दरम्यान बॉडीकॉन ड्रेसेसशी साधर्म्यअसलेले चेनमेल ड्रेस तयार केले. एकंदरीतच फॅशन जगतात हे बॉडीकॉन ड्रेसेस बऱ्याच दशकांपासून वर्चस्व गाजवत आहेत.
पण हे लक्षात ठेवाच.
बॉडीकॉन किंवा बॅण्डेज डे्रसेसची फॅशन करणार असाल तर या फॅशनमधले बारकावेही माहित असायला हवेत. ते माहित असल्याशिवाय ही फॅशन उठून दिसत नाही उलट ती फसण्याचीच शक्यता जास्त असते.
1) हा ड्रेस कॅरी करायचा असेल तर अत्यंत आत्वविश्वासपूर्ण देहबोली असायलाच हवी तेव्हाच हा ड्रेस तुमच्यावर सूट होईल.
2) या ड्रेसवर एखादाच अत्यंत सुंदरसा महागडा नेकपीस घाला. फार जास्त एक्सेसरीज घालण्याची गरजच नाही.
3) हाय हील्स किंवा स्टेलेटोजच घाला बाकी काहीही नको.
4)स्टोन्स वगैरे लावलेले क्लचेसच हातात हवेत, लांब पट्ट्याच्या पर्सेस अजीबातच नकोत.