मोबाइलवर भरमसाठ अॅप्स भरुन ठेवलेत? - तुम्ही आऊटडेटेड आहात का?
By admin | Published: July 14, 2017 04:30 PM2017-07-14T16:30:58+5:302017-07-14T16:31:35+5:30
जितके तुमच्या मोबाइलवर अॅप्स जास्त, तितके तुम्ही मागास ठरू शकता..
- चिन्मय लेले
एकेकाळी अॅप्सची केवढी गर्दी. नवीन अॅप आलं की कर डाऊनलोड, कुणाच्या फोनमध्ये कुठलं अॅप दिसलं की भर ते आपल्या मोबाइलमध्ये. आपल्याकडे अमूकतमूक अॅप आहे हे सांगण्याचीच इतकी चढाओढ की त्या अॅपमुळे फोनमधली जागा व्यापते, फोन स्लो होतात आणि त्याचा उपयोग पुन्हा शून्यच हे कुणी सांगितलं नाही. आता मात्र अॅपचा भर ओसरला तसा एकदम एक नवीन ट्रेण्ड आला आहे. आणि तो असं म्हणतो की, तुम्ही जर तुमच्या फोनमध्ये भरमसाठ अॅप्स भरुन ठेवत असाल तर समजा की, तुम्ही आऊटडेटेड आहात. कारण कनेक्टिव्हिटी फास्ट होत असल्याच्या या जगात आता अॅप्सची गरजच फारशी उरलेली नाही. आणि तरीही तुमच्या फोनमध्ये पुढी अॅप्सची गर्दी असेल तर ती काढा, कारण त्यांचा तुम्हाला काहीच उपयोग नाही, हे एकदा मान्य करुन टाकलेलं बरं!
१) मेण्टल हेल्थ अॅप्स
हे अॅप्स अनेकजण आवडीनं डाऊनलोड करुन घेतात. सुरुवातीला ते लावून ध्यान धारणा, श्वसनाचे प्रकार, श्वासावर एकचित्त वगैरे प्रयोग करतात. पुढे ते बंद पडतात. आणि अॅप्स मात्र पडून राहतात. हौशीनं डाऊनलोड केलेले असे मेण्टल हेल्थ अॅप्स काढा. एखादं, रोजच्या वापरातलं ठेवाायला हरकत नाही.
२) अध्यात्म अॅप्स
आपल्याला सगळ्यांनाच मन:शांती हवी असते. ती इझी हवी असते. म्हणून हे अॅप. श्लोक, अध्यात्म, भजनं, भाषणं देणारी. त्यांचाही उपयोग रोज नाही, पडून असतात अडगळीसारखी.
५) फिटनेस अॅण्ड डाएट
हे तर भयानक प्रकरण. फिटनेसचे इतके अॅप्स सध्या उपलब्ध आहेत. दर पाऊलाचा हिशेब हे अॅप्स ठेवतात. पण त्यानं कितीजणांना फिटनेस वाढीला उपयोग होतो, शोधायला हवं. तुम्हाला उपयोग होत नसेल तर किमान मोबाइलमधली जागा तरी मोकळी करा.