​‘फर्स्ट इम्प्रेशन’ पाडायचेय? तर मग हे कराच...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2016 06:10 PM2016-07-27T18:10:18+5:302016-07-27T23:47:30+5:30

इंग्रजीमध्ये ज्याला ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणतात ती पहिल्या भेटीत पडणारी छाप जर चांगली असेल तर नातं वाढतं.

Find the 'First Impression'? So this is the way ... | ​‘फर्स्ट इम्प्रेशन’ पाडायचेय? तर मग हे कराच...

​‘फर्स्ट इम्प्रेशन’ पाडायचेय? तर मग हे कराच...

Next
पहिल्याच भेटीत तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वोत्तम पैलूंची छाप पाडण्याचे आठ मार्ग


नाते व्यावसायिक असो किंवा वैयक्तिक, दोन व्यक्तींमध्ये परस्पर संबंध प्रस्थापित होऊन ते पुढे नात्यामध्ये विकसित होण्यासाठी एकमेकांविषयी बनलेल्या मताची भूमिका खूप महत्त्वाची असते. इंग्रजीमध्ये ज्याला ‘फर्स्ट इम्प्रेशन’ म्हणतात ती पहिल्या भेटीत पडणारी छाप जर चांगली असेल तर नातं वाढतं. म्हणजे तुम्ही संभाव्य ग्राहकाला किंवा व्यावसायिक भागीदाराला भेटणार असाल, तुमचा प्रस्ताव त्याचा समोर मांडणार असाल तर अशा वेळी पुढीलपैकी कोणती गोष्ट तुमच्या व्यावसायिक नात्याचा पाया भक्कम करेल?

* तुमचे कौशल्य, अनुभव आणि क्षमता किंवा
* तुमची विश्वासहर्ता

अनेकजण पहिल्या पर्यायाची निवड करतील. कारण मला जर समोरील व्यक्तीसोबत व्यावसा करायचा असेल तर त्याच्यामध्ये कौशल्य, अनुभव आणि क्षमता असलीच पाहिजे. त्यामुळे स्वाभाविकपणे पहिल्या पर्यायाच योग्य वाटतो.

परंतु येथेच तर आपल्या मेंदूच्या कार्यप्रणालीमध्ये खरा ट्विस्ट येतो. पहिल्या भेटीत समोरील व्यक्ती तुमच्याबद्दल मत बनवताना तुमच्या टॅलेंट अथवा अनुभवाऐवजी तो एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत असतो : मी या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकतो का?

म्हणजे पहिल्याच भेटीत तुमची विश्वासहर्ता दिसून आली नाही तर कदाचित समोरील व्यक्ती तुमच्यासोबत पुढे नातं ठेवू इच्छिणार नाही. नोकरीसाठी मुलाखतीला गेल्यावर तर ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. सकारात्मक ‘ग्रेट फर्स्ट इम्प्रेशन’ पाडण्यासाठी तुम्ही या गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

First Impression

१. बोलण्यापेक्षा कान देऊन ऐका

समोरील व्यक्ती काय म्हणते याकडे जास्त लक्ष द्या. स्मितहास्य, चेहºयावरील हावभावांनी त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद द्या. आपले म्हणने कोणतरी लक्ष देऊन ऐकतोय, त्याला समजून घेतोय ही भावना पुढच्या व्यक्तीचा तुमच्यावरील विश्वास वाढवते.

२. संपूर्ण लक्ष द्या

कोणाशी बोलत असताना आपल्या फोनशी खेळणे, मध्येचे कॉम्प्युटर स्क्र ीनकडे पाहणे, आजुबाजूला पाहणे यासारख्या गोष्टी करण टाळले पाहिजे. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर त्याच्याकडे संपूर्ण लक्ष देता तेव्हा आपोआप त्याच्या मनात तुमची सकारात्मक छाप पडते.

३. आदान-प्रदानाची वृत्ती

समोरच्या व्यक्तीपासून मला काय मिळणार, माझा काय फायदा असा केवळ स्वत:पुरता विचार ठेवून कोणाला भेटू नका. मी त्याला काय देऊ शकतो, माझ्यामुळे त्याला काय लाभ होऊ शकतो याचा विचार करा. एकमेकांच्या हिताचा विचार केला असता नातं आपोआप विकसित होते.

४. तुर्रम खान वृत्ती सोडा

मी म्हणजे खूपच मोठा आणि मला भेटणारा कोणी गरजवंत अशी श्रेष्ठपणाची वृत्तीचा त्याग करणे परस्पर संबंध निर्माण होण्याची पहिली अट म्हणता येईल. समान पातळीवर येऊनच बोलणी झाली पाहिजे. दुसºयांना महत्त्व देणारा व्यक्ती प्रत्येकालाचा आपलासा वाटतो.

first impression

५. प्रश्न विचारा पण जपून

समोरच्याचे ऐकताना त्याला अधुनमधून प्रश्न विचारा. असे केल्याने तुमचे कुतुहल आणि उत्सुकता दिसून येते. पण असे करताना उगीच प्रश्नांचा भडिमार करू नका. मोजकेच पण नेमके प्रश्नर विचारा, जेणेकरून संभाषण खुंटण्याऐवजी ते अधिक प्रगल्भ होईल.

६. शब्द जपून वापरा

तलवारीचा वार काळाच्या ओघात भरून निघतो परंतु शब्दांचा घाव अधिकाधिक खोल होत जातो. म्हणून बोलताना शब्द जपून वापरा. सकारात्मक शब्दांची निवड करा. एक दा उच्चारलेला शब्द परत घेता येत नाही. तुमच्या बोलण्यातून तुमची प्रवृत्ती निदर्शनास येत असते.

७. निंदानालस्ती नकोच

गॉसिप ऐकायला आपल्या सर्वांनाच आवडते. पण असे करणार्‍या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापूर्वी आपणच दहा वेळा विचार करतो. म्हणून पहिल्याच भेटीत इतरांच्या चुका, त्यांच्यावर टीका किंवा त्यांच्या अपयशाचे पाढे वाचून दाखवू नका. असे करून तुम्ही तुमचीच विश्वासहर्ता गमावून बसता.

८. नम्र भावनांचा स्पर्श येऊ द्या

तटस्थ, कोरडे, रुक्ष संभाषणातून भावनिक नात्याचे बीज कसे रुजणार? समोरील व्यक्तीसोबत चांगला ‘रॅपो’अर्थातच जवळिकता निर्माण करण्यासाठी नम्रपणे स्वत:चे अनुभव शेअर करा. परंतु असे करताना स्वत:चेच रडगाणे गाऊ नका.

Web Title: Find the 'First Impression'? So this is the way ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.