​मराठीतील पहिला ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ स्टॅन्ड-अप शो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2016 03:31 PM2016-06-24T15:31:04+5:302016-06-24T21:01:04+5:30

आशुतोष दाबके या स्टँडअप कॉमेडियनने निव्वळ आणि निखळ ‘प्रौढ विनोदां’चा एकपात्री प्रयोग सुरू केला आहे.

The first 'Adult Comedy' stand-up show in Marathi | ​मराठीतील पहिला ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ स्टॅन्ड-अप शो

​मराठीतील पहिला ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ स्टॅन्ड-अप शो

Next
‍ॅडल्ट कॉमेडी’ हा प्रकार आता आपल्याकडे बर्‍या प्रमाणावर रु जू होत आहे. सिनेमांपासून ते लाईव्ह शो अशा स्वरुपात ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ सादर केली जाते.

इंग्रजी किंवा हिंदीमध्ये अशा प्रकारचे लाईव्ह शो मोठ्या प्रमाणात होतात़; मात्र आता मराठीमध्येसुद्धा आशुतोष दाबके या स्टँडअप कॉमेडियनने निव्वळ आणि निखळ ‘प्रौढ विनोदां’चा एकपात्री प्रयोग सुरू केला आहे.

‘वेट विकेट’ या नावाचा धमाल स्टँडअप शो ते सादर करतात. मराठी प्रेक्षकांसाठी तुलनेने नवीन असणारा हा कार्यक्रम आता मुंबई-पुण्यानंतर विविध शहरात सादर होत आहे.

शनिवारी (दि. २५ जून) नाशिक येथे तर रविवारी (दि. २६) औरंगाबाद येथे ‘वेट विकेट’चा प्रयोग होणार आहे. रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग, घटना आणि सवयी ‘चावट चटकदार’ भाषेत (पण अश्लील नाही!) फुलवून, सजवून सांगणारा हा कार्यक्रम आहे. 

‘आपल्या प्रत्येकामध्ये थोड्या-जास्त प्रमाणात चावटपणा असतो. फक्त चारचौघांत तो दिसू न देण्याचा आपला प्रयत्न असतो. असेच जाहीरपणे न बोलता येणारे पण आपसुक चेहर्‍यावर हसू आणणारे विनोद ‘वेट विकेट’मध्ये मी सादर करतो. असे करत असताना अश्लीलता किंवा लैंगिकतेचा लवलेशही नसतो. पती-पत्नी आणि इतर प्रौढ लोक  या वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमाचा निसंकोचपणे आनंद घेऊ शकतात, अशी माहिती आशुतोष दाबके यांनी ‘सीएनएक्स’ला दिली.

दोन तासांच्या या एक पात्री कार्यक्रमाचे अद्याप बारा खेळ झाले आहेत.

विशेष म्हणजे आशुतोष हे काही व्यावसायिक कलाकार नाहीत. ते सांगतात, ‘खाजगी कंपनीमध्ये मी नोकरी करायचो. पण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझा आवर्जुन सहभाग राहायचा. कथा-विनोद-कविता लिहिण्याचा मला लहानपणापासूनच छंद होता. ‘प्रौढ विनोद’ मराठी रंगभूमीवर सहसा पाहायला मिळत नाही. मी त्याला मनोरंजनाचा एक विशेष प्रकार मानतो. पु.ल. देशपांडे - व. पु. काळेसारख्या महान साहित्यिकांच्या विनोदावर प्रगल्भ झालेल्या मराठी रसिकांना ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’चा हा अनुभव नक्कीच आवडेल याची खात्री आहे.’

Web Title: The first 'Adult Comedy' stand-up show in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.