फिलिपीन्सची काट्रियोना मिस युनिव्हर्स ठरली; मात्र स्पेनच्या एंजेलाचीच चर्चा रंगली!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 01:18 PM2018-12-17T13:18:52+5:302018-12-17T13:21:57+5:30
बँकॉक येथे रंगलेल्या 67व्या 'मिस युनिव्हर्स' या जगातील नामांकित सौंदर्य स्पर्धेमध्ये फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा 'मिस युनिव्हर्स'चा ताज पटकावला. पण यंदाच्या या स्पर्धेत आकर्षणाचा विषय ठरली ती म्हणजे स्पेनची एंजेला पॉन्स.
बँकॉक येथे रंगलेल्या 67व्या 'मिस युनिव्हर्स' या जगातील नामांकित सौंदर्य स्पर्धेमध्ये फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने यंदाचा 'मिस युनिव्हर्स'चा ताज पटकावला. पण यंदाच्या या स्पर्धेत आकर्षणाचा विषय ठरली ती म्हणजे स्पेनची एंजेला पॉन्स. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, 'मिस युनिव्हर्स'चा मानाचा किताब न पटकावताही ती आकर्षणाचा विषय का बनली? कारणही तसचं आहे. एंजेला एक ट्रान्सजेंडर आहे. मिस यूनिव्हर्स स्पर्धेच्या 66 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका ट्रान्सजेंडर महिलेने सहभाग घेतला. ती फक्त सहभागीच झाली नाही तर ती फायनल राउंडपर्यंत पोहोचली. पण विजयी ठरू शकली नाही. पण या स्पर्धेत न जिंकताही ती इतकी पॉप्युलर झाली की सध्या तिच्या आणि तिच्या अलौकिक सौंदर्याच्या चर्चा संपूर्ण जगभरात होत आहेत.
2018मधील मिस युनिवर्सचा किताब फिलिपीन्सची काट्रियोना ग्रे हिने पटकावला असला तरिही तिच्यापेक्षा जास्त चर्चा एंजेलाच्या नावाची होताना दिसत होती. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या नेहल चुडासमा हिला टॉप-20 मध्येही आपले स्थान राखता आले नाही.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रान्सजेंडर व्यक्तींविषयीच्या कायद्यांवर अनेक संशोधनं केले होते. त्यामुळेच एंजेला पॉन्स सन्मानाने मिस युनिवर्समध्ये सहभागी होऊ शकली आणि फायनलपर्यंतचा प्रवासही करू शकली.
आपल्या या यशाबाबत बोलताना एंजेला असं म्हणाली की, 'एक महिला असण्यासाठी फक्त योनीचीच आवश्यकता नाही. मला माहीत आहे की, मी एक महिला म्हणूनच जन्माला आले होते. आणि हिच माझी खरी ओळख आहे.
एंजेला सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असून इन्स्टाग्रामवर 5 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील फॅन्सची संख्या पाहता एक ट्रान्सजेंडर असूनही तिने समाजात एक मानाचे स्थान मिळवले आहे. एंजेला डायर, डिझ्नी लँड यांसारख्या मोठ्या ब्रँडसाठीही तिने काम केलं आहे. एका ब्रेस्ट कॅन्सरच्या एनजीओसाठीही ती काम करते.