पाच वाईट सवयींचे अल्टिमेट फायदे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:11 AM2016-01-16T01:11:42+5:302016-02-06T07:04:45+5:30
आता तुम्ही म्हणाल की वाईट सवयींचे काय फायदे असू शकतात?
आ ा तुम्ही म्हणाल की वाईट सवयींचे काय फायदे असू शकतात? वाईट सवयी मोडण्यासाठी तर सगळे जण प्रयत्न करीत असतात. लहानपणीच याची ट्रेनिंग सुरू होते. समाजाच्यादृष्टीने काही सवयी या वाईट असतात. परंतु काही वाईट समजल्या जाणार्या सवयींचासुद्धा आपल्याला लाभ होऊ शकतो. तो कसा वाचा जरा.. 1. हातापायाची चुळबुळ
काही जणांना लहानपणी एका जागी स्थिर बसलेच जात नाही. सतत हातापायाची चुळबुळ सुरू असते. त्यामुळे आईवडिलांचा मारही खावा लागतो. परंतु प्रौढ वयात हीच सवय आरोग्यासाठी लाभदायक ठरते. आजच्या डेस्क ऑफिसच्या युगात शरीराची हालचाल अगदीच नगण्य होऊन गेली आहे. त्यामुळे हातपायाची अशा प्रकारे केलेली हालचाल उपयोगी पडू शकते.
2. रोज आंघोळ न करणे
आंघोळ केल्याशिवाय बाहेर पडणेच बर्याच जणांना अशक्य वाटू शकते. पण आठवड्यातून एक-दोन दिवस आंघोळ न करणे त्वचेसाठी फायद्याचे असते. कारण साबणामुळे आपल्या त्वचेची नैसर्गिक मुलायमता नष्ट होते. त्याबरोबरच पृष्ठभागावर असणारे काही बॅक्टेरिआ अनेक त्वचारोगापासून आपले संरक्षण करत असतात. त्यामुळे आंघोळ न करणे म्हणजे फार मोठा गुन्हा नाही.
3. गॉसिप
सहकार्यांच्या चर्चेचा किंवा थट्टेचा विषय होणे कोणालाच आवडणार नाही. तसे पाहिले तर गॉसिप करणे वाईट समजले जाते. मात्र तुम्ही जर गॉसिप करत असाल तर तुमच्या आरोग्याला ते उपयुक्त आहे. मिशिगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका संशोधनातून असे दिसून आले की गॉसिप करतान महिलांमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स स्रवले जातात, ज्यामुळे ताण आणि चिंता कमी होते. परंतु हे गॉसिप कुणासाठी मनस्तापाचे कारण ठरू नये.
4. राग व्यक्त करणे
छोट्या छोट्या गोष्टीवर चिडचिड करणे नक्कीच चांगली सवय नाही. मात्र अधुनमधून तुम्हाला जे अयोग्य वाटते ते बोलून दाखवणे आरोग्यासाठी फार गरजेचे असते. ऑफिसमध्ये राग व्यक्त न करणार्या कर्मचार्यांना हृदयविकाराचा दोन ते पाच पट अधिक धोका असतो. पण याचा अर्थ असा नाही की उठसुठ इतरांवर राग काढावा. तसे करणे खरेच चुकीचे आहे.