​जॉबमध्ये समाधानी असल्याचे पाच लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2016 10:01 AM2016-08-23T10:01:58+5:302016-08-23T15:31:58+5:30

जॉब सिक्युरिटी, स्पर्धा, डेडलाईन या सगळ्या पे्रशरखाली तणाव वाढून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

Five Symptoms That Are Satisfied With Job | ​जॉबमध्ये समाधानी असल्याचे पाच लक्षणे

​जॉबमध्ये समाधानी असल्याचे पाच लक्षणे

Next
मवार हा बहुदा नोकरी करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांचा नावडता दिवस. लहानपणी शाळेत जाण्याचा जसा कंटाळा यायचा तसाच कंटाळा जर आॅफिसचाही येत असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या नोकरीमध्ये खुश नाही. जॉब सिक्युरिटी, स्पर्धा, डेडलाईन या सगळ्या पे्रशरखाली तणाव वाढून त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे माणसाने एक तर आपल्या आवडीचे काम करावे किंवा जे काम करतो त्यामध्ये आवड निर्माण करावी. मग कसं कळणारं आपण आपल्या नोकरीत आनंदी आहोत? 

त्याची ही काही लक्षणे :

१. वेळेचे भानच राहत नाही :
आवडीचे काम असेल तर आपल्याला वेळ कसा जातो हेच कळत नाही. प्रत्येक पाच मिनिटाला आपली नजर घडीकडे जात नसेल तर समजावे तुम्ही जॉबमध्ये समाधानी आहात.

२. सहकर्मचारी एकदम मित्रासारखे :
आॅफिसमधील सहकारी केवळ ‘कलिग्स’ न वाटता मित्र वाटत असतील तर हे चांगले लक्षण आहे. कारण अशाच लोकांसोबत तुम्हाला काम करताना आनंद येईल.

३. कुटुंबासाठी वेळ मिळतो :
आपल्या प्रियजनांना, कुटुंबाला देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणती?

४. सोमवारची भीती न वाटणे :
विकेंडला धमाल केल्यावर उद्या सोमवार म्हणून जर मनावर दडपण येत नसेल तर समजून जावे की, तुम्हाला तुमचे काम आवडते. 

५. रोज नवी आव्हाने :
आॅफिसमधील प्रत्येक नवीन दिवस अ‍ॅडव्हेंचर वाटत असेल तर खूपच चांगली गोष्ट. नवी आव्हाने आपल्या क्षमता वाढवत असतात.

Web Title: Five Symptoms That Are Satisfied With Job

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.