ऑफिस पार्टीत हे शिष्टचार पाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:09 AM2016-01-16T01:09:21+5:302016-02-05T14:13:49+5:30
कॉर्पोरेट ऑफिसमध्ये अधूनमधून पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. कर्मचार्यांना खूश करण्यासाठी अशा पाटर्...
Next
क र्पोरेट ऑफिसमध्ये अधूनमधून पाटर्य़ांचे आयोजन करण्यात येते. कर्मचार्यांना खूश करण्यासाठी अशा पाटर्य़ा होत असतात. मात्र काही वेळा पार्टीमध्ये आपली वर्तणूक पार्टीची रंगत वाढविण्याऐवजी एक वेगळीच समस्या निर्माण करू शकते. याचा करिअरवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ऑफिस पार्टीमध्ये पुढचे पाच शिष्टाचार पाळायलाच हवेत.
१. उगाच चमकोगिरी नको
आपण पार्टीचे आकर्षण बिंदू असावे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र पूर्ण वेळ सगळ्या पार्टीचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी उगाच आटापिटा करू नये. असे चमकोगिरी करणारे लोक लगेच लक्षात येतात आणि लोकांच्या मनात त्यांची वाईट इमेज निर्माण होते.
२. खाद्यपदार्थांवर तुटून पडू नका
बफे उघडला किंवा बार दिसला की जिभेवरचे सगळे नियंत्रण सोडून अधाशासारखे तुटून पडणे मुळीच प्रोफेशनल नाही. कॉर्पोरेटमध्ये असे वर्तन म्हणजे वेडेपणाचे लक्षण समजले जाते.
३. वाढदिवसाच्या पार्टीसारखे नाचू नका
पार्टी ही एन्जॉय करण्यासाठी असते असले तरी ऑफिस पार्टी इतकीही फॉर्मल नसते. त्यामुळे मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत जसे वागता तसे ऑफिस पार्टीमध्ये वागू नये.
४. नो ऑफिस टॉक
पार्टीत ऑफिस किंवा कामाविषयी बोलून स्वत:ला बोरिंग किंवा निरस सिद्ध करू नका. कामाचा ताण थोडा निवळण्यासाठी या पार्टीज् असतात. तेथे ऑफिशियल चर्चेला स्थान नाही.
५. मित्रता वाढवा
ऑफिस पार्टीमध्ये सहकार्यांशी मोकळेपणे बोला. आनंद लुटा, मौजमजा करा. ज्यांच्याशी फारसा संबंध येत नाही अशा कर्मचार्यांशी ओळख वाढवा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पार्टीतून लगेच थोड्यावेळाने निघून जाऊ नका.