Cannesच्या रेड कार्पेटसाठी फ्रेंच अभिनेत्रीने निवडला 'या' भारतीय डिझायनरचा ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2019 18:01 IST2019-05-18T17:49:12+5:302019-05-18T18:01:42+5:30
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या एक नाही तर तीन ग्लॅमर्स अभिनेत्रींनी हजेरी लावली. दीपिका, प्रियांका आणि कंगनाने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली.

Cannesच्या रेड कार्पेटसाठी फ्रेंच अभिनेत्रीने निवडला 'या' भारतीय डिझायनरचा ड्रेस
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या एक नाही तर तीन ग्लॅमर्स अभिनेत्रींनी हजेरी लावली. दीपिका, प्रियांका आणि कंगनाने कान्सच्या रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. या तिघींच्याही लूकची सोशल मीडियासह फॅशन वर्ल्डमध्येही चर्चा झाली. या तिघींचेही आउटफिट्स परदेशी फॅशन डिजायनर्स आणि स्टायलिशनी डिझाइन केले होते. पण फ्रान्समधील अभिनेत्री आणि फिल्ममेकर मेलिटा टॉस्कन डू प्लांटियरने 72व्या कान्स फिल्स फेस्टिव्हलमधील आपल्या रेड कार्पेट लूकसाठी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जीची निवड केली होती.
सब्यसाचीने मेलिटासाठी आयवरी व्हाइट कलरचा एक सुंदर सिल्क पोट्रेट गाउन डिझाइन केला होता. ज्यवर सुंदर फ्लोरल वर्क करण्यात आलं होतं. ड्रेसची हायलाइट होती सब्यासाचीचा सिग्नेचर रॉयल बंगाल टाइगर मोटिफ असणारा व्हाइट कलरचा मॅचिंग वेस्ट बेल्ट.
मेटिलाचा हा गाउन आणि लूक अत्यंत सिंम्पल असण्यासोबतच एलिगंट होता. हेअर स्टाइलबाबत सांगायचे झाले तर मेलिटाने हाय पफ बन बांधला होता. त्याचबरोबर इमरेल्ड ग्रीन कलरचे ड्रॉप ईअररिंग्स आणि मॅचिंग क्लच वेअर केले होते.
रेड कार्पेटवर हा गाउन वेअर करण्याआधी मेलिटा या गाउनसोबत दिसून आली होती. डिझायनर सब्यासाचीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही हे फोटो शेअर केले होते. दरम्यान, मेलिटाचं भारतीय चित्रपटांशीही संबंध आहे. भारताची अवॉर्ड विनिंग फिल्म मसानची ती को-प्रोड्यूसर होती.
Cannes फिल्म फेस्टिवल 2019च्या तिसऱ्या दिवशी रेड कार्पेटवर बॉलिवूडच्या एक नाही, दोन नाही तर चक्क तीन-तीन अभिनेत्रींनी एन्ट्री घेतली आणि आपला क्लासी लूक आणि घायाळ करणाऱ्या अदांनी फॅन्ससोबतच क्रिटिक्सच्या मनाचा ठाव घेतला. दीपिका पादूकोण ने सलग चौथ्या वर्षी Cannesच्या रेड कार्पेटवर वॉक केलं तर कंगनाचं हे दुसरं वर्ष होतं. बॉलिवूड आणी हॉलिवडूमध्ये आपल्या अभिनयाने आपला ठसा उमटवणाऱ्या देसी गर्ल प्रियांका चोप्राने यावर्षी कानमध्ये डेब्यू केला आहे.