भविष्यवेत्ता अल्विन टॉफलर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2016 07:59 AM2016-07-01T07:59:30+5:302016-07-01T13:29:30+5:30

विष्यकार अल्विन टॉफलर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.

Future Alvin Toffler dies | भविष्यवेत्ता अल्विन टॉफलर यांचे निधन

भविष्यवेत्ता अल्विन टॉफलर यांचे निधन

Next
्युचर शॉक’ पुस्तकाचा लेखक आणि भविष्यातील सामाजिक, आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्याबाबतीत जगात कशी परिस्थिती असेल याची भविष्यवाणी करणारा भविष्यकार अल्विन टॉफलर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले.

आज अस्तित्वात असणार्‍या कित्येक गोष्टींची टॉफलर यांनी साठच्या दशकातच अंदाज व्यक्त केला होता.

‘इनफॉर्मेशन ओव्हरलोड’सारख्या संज्ञांना प्रचलित करणार्‍या टॉफलर यांच्या ‘फ्युचर शॉक’ या पुस्तकाच्या दीड कोटींहून अधिक प्रती विकल्या गेलेल्या आहेत.

भविष्याचा अचुक वेध घेण्याच्या अचुक दृष्टीमुळे अनेक प्रथितयश व्यावसायिक आणि जागतिक नेते त्यांचे मार्गदर्शन घेत असत.

त्यामध्ये रशियाचे नेते मिखाईल गोर्बाचेव्ह, चीनचे पंतप्रधान झाओ झियांग आणि मेक्सिकोचे बिझनेस गुरू कार्लोल स्लिम यांचा सामावेश आहे.

इंटरनेटचा प्रसार आणि विभक्त कुटुंब पद्धतीचा उदय यासारख्या अनेक गोष्टींचे त्यांनी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले. सामाजिक बदल हेरुन ते अत्यंत सोप्या शब्दांत मांडण्याच्या त्यांच्या अद्भूत शैलीमुळे वाचकांमध्ये ते खूप लोकप्रिय होते.

ते म्हणाले होते की, एकविसाव्या शतकात केवळ लिहिता-वाचता न येणारा माणूस म्हणजे अडाणी नसणार. जो जूने शिकलेले विसरून पुन्हा नव्याने शिकू शकत नाही तो देखील अडाणी असणार.
 

Web Title: Future Alvin Toffler dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.