/>पर्यावरणाची हानी होऊ नये, याकरिता अनेक गणेश मंडळाकडून दरवर्षी इको फे्रंडली गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे आवाहन करण्यात येते. तसेच काही स्वयंसेवी संस्थाही जनजागृतीचे काम करतात. त्यामुळे अनेकांचा कल शाडूच्या मातीच्या किंवा नैसर्गिक पदार्थाचा वापर करुन, मूर्तीकडे वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थ, झाडात तर कुणी फुुलांचा वापर करुन, मूर्ती साकारतात. तामिळनाडूमध्येही नैसर्गिक पद्धतीने मूर्ती तयार करण्याकडे कल वाढत आहे. चेन्नई येथील एका मंडळाने अननसचा वापर करुन गणपती साकारला आहे. २० फूटापेक्षाही अधिकच मोठी ही मूर्ती आहे. त्याला जवळपास ३ टन अननस वापरण्यात आले आहेत. त्याकरिता ऊसाचाही वापर करण्यात आला आहे. चेन्नईतील कोलार भागात या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी अननसापासून मूर्ती साकारण्यात आल्याची माहिती मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली. या गणपतीचे नयनरम्य रुप पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे. या मूर्तीला सोड, कान, डोळे हे उत्तमप्रकारे साकारण्यात आले आहेत. त्यामुळे बघण्यासाठी येणारे प्रत्येकजण या बाप्पाला कॅमेºयात कैद करीत आहे.
Web Title: Ganapati has started from 3 tons of pineapple
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.