Ganesh Chaturthi 2017 : यावर्षी श्री गणेशजींना द्या विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:24 PM2017-08-23T12:24:56+5:302017-08-23T18:01:54+5:30
आपणही यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्याचा विचार करीत असाल तर यावर्षी गणेशजींना विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य द्यायला विसरु नका.
Next
भारतात यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव २५ आॅगस्टपासून सुरुवात होत असून ५ सप्टेंबरपर्यंत साजरा केला जाईल. कोणत्याही कामाचा शुभारंभ करण्याअगोदर लोक सर्वप्रथम गणेशजींची पूजा करतात. जर आपणही यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा करण्याचा विचार करीत असाल तर यावर्षी गणेशजींना विविध प्रकारच्या मोदकांचे नैवेद्य द्यायला विसरु नका.
गणेशजींना मोदक खूपच आवडत होते ज्यामुळे त्यांना मोदकप्रियदेखील म्हटले जाते. मोदक अशी मिठाई आहे ज्यात नारळ आणि गुळ भरून तयार केले जाते. मोदकाला मुळत: असेच तयार केले जाते. मात्र वेळेनुसार लोकांनी यावर प्रयोग केले आणि बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे मोदक मिळू लागले. विशेष म्हणजे आपणही अशाप्रकारचे मोदक तयार करु शकता. यावर्षी आपणही वेगवेगळ्या पद्धतीचे मोदक बनवून गणेशजींना नैवद्य देऊन प्रसन्न करू शकता.
* डार्क चॉकलेट मोदक
चॉकलेट पावडर आणि ग्लूकोज बिस्किटपासून आपण हा मोदक तयार करु शकता. हा मोदक अजून आकर्षक बनविण्यासाठी याच्या बाह्यभागावर मेल्ट केलेली चॉकेलट फिल करु शकता. याशिवाय नारळ आणि ड्रायफ्रूट्सचादेखील वापर करू शकता.
* उकडीचे मोदक
उकडीच्या मोदकांना स्टीम्ड मोदकही म्हटले जाते. हे मोदक वाफ देऊन तयार केले जातात. हे मोदक तांदळाचे पिठ, मैदा किंवा गव्हाचे पिठाने बनवून त्यात नारळ आणि गुळाची फीलिंग भरली जाते.
* फ्राय मोदक
हे मोदक पूर्णत: गव्हाच्या पिठाने बनविले जातात. या मोदकांना डिप फ्राय केले जातात म्हणून त्यांना फ्राय मोदक म्हणतात. यांच्या मध्ये साखर आणि नारळ फीलिंग केले जाते आणि हे बाहेरुन खूपच क्रिस्पी आणि कुरकुरीत असतात.
* ड्रायफ्रूट्स मोदक
बदाम, काजू, किसमिस, पिस्ता, विना बियांचे खजूर आणि खसखसच्या मिश्रणाने या मोदकाला तयार केले जाते. चांगला आकार देण्यासाठी यात आपण नारळदेखील मिक्स करु शकता.
* हरबरा दाळ मोदक
या मोदकांना सामान्य पद्धतीनेच बनविले जातात. फक्त यांची फीलिंग वेगळी असते. यात हरबरा दाळ आणि गुळ एकत्र करुन सोबत भाजविले जाते आणि हे मिश्रण भरले जाते.
* रवा मोदक
हे मोदक रव्यापासून बनविलेले असतात. यांच्यात नारळ, गुळ, खसखस आणि ड्रायफ्रूट्सचे मिश्रण भरले जाते. हे मोदक बनविण्यासाठी रवा एका पॅनमध्ये भुजून एका प्लेटमध्ये ठेवावा. एका दुसऱ्या पॅनमध्ये पाणी, दूध आणि थोडे तूप घ्यावे. जेव्हा हे मिश्रण उकडू लागेल तेव्हा यात भुजलेला रवा मिक्स करा. जोपर्यंत हे मिश्रण पिठासारखे होत नाही तोपर्यंत त्याला घोळत राहा. हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण याला मोदकाच आकार देऊ शकता.