स्मार्टफोनमधील डिलीट झालेला डाटा असा परत मिळवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2016 05:19 PM2016-12-09T17:19:10+5:302016-12-09T17:19:10+5:30

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात आपण महत्त्वाचा डाटा ठेवतो. पण बºयाचदा नजरचुकीने हा डाटा डिलीट होतो. तेव्हा तो डाटा परत मिळविणे खूप कठीण होते. परंतु घाबरू नका

Get back the deleted data from the smartphone | स्मार्टफोनमधील डिलीट झालेला डाटा असा परत मिळवा

स्मार्टफोनमधील डिलीट झालेला डाटा असा परत मिळवा

googlenewsNext
्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे यात आपण महत्त्वाचा डाटा ठेवतो. पण बºयाचदा नजरचुकीने हा डाटा डिलीट होतो. तेव्हा तो डाटा परत मिळविणे खूप कठीण होते. परंतु घाबरू नका. तुम्ही तुमच्या अँंड्राईड फोनमधून डिलीट झालेला डाटा पुन्हा मिळवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला डाटा रिकव्हरी सॉफ्टवेयरची गरज लागेल. काही वेळातच तुमचा गेलेला डाटा तुम्हाला परत मिळेल.
तसे तर डिलीट झालेला डाटा परत मिळवण्यासाठी इंटरनेटवर भरपूर फ्री आणि पेड सॉफ्टवेयर मिळतील. अशीच एक साइट  7datarecovery.com यावर जाऊन तुम्हाला काही वेळात तुमचा डाटा तु्म्हाला परत मिळेल. अगोदर 7datarecovery.com वर जाऊन रिकव्हरी सूट सॉफ्टवेयरला तुमच्या संगणकात डाऊनलोड करुन इंस्टॉल करा. आता तुमच्या अँंड्राइड फोनला संगणकाला जोडून फोनला स्कॅन करा. जेव्हा तुमचा फोन स्कॅन होईल, तुमचा डाटा तुम्हाला परत मिळालेला असेल. आता जो डाटा तुम्हाला परत हवा असेल त्या बॉक्ससमोर टिक मार्क करुन त्याला निवडा. त्यानंतर सेव्ह आॅप्शनवर जाऊन निवडा, तुमचा डाटा तुम्हाला परत मिळालेला असेल.

Web Title: Get back the deleted data from the smartphone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.