फेसबुकवर असे वागल्याने अनफ्रेंड करतात मुली !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2017 11:40 AM2017-02-02T11:40:31+5:302017-02-02T17:10:31+5:30

सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात...

Girls do such unfriendly behavior on Facebook! | फेसबुकवर असे वागल्याने अनफ्रेंड करतात मुली !

फेसबुकवर असे वागल्याने अनफ्रेंड करतात मुली !

Next
शल मीडिया तसे अभिव्यक्तीसाठी स्वतंत्र व्यासपीठ आहे. मात्र सतत नको ते शेअर करणे, दुसऱ्याला त्रास देणे, असे चुकीचे वागणे आपणास महाग पडू शकते. यामुळे लोक आपणास अनफ्रेंड किंवा ब्लॉक करू शकतात, याशिवाय सर्वांसमोर आपली टर देखील उडविली जाऊ शकते.     

जेव्हा पासून सेल्फीचा ट्रेंड सुरू झाला, तेव्हापासून लोकं अक्षरश: बाथरुमपर्यंतचा सेल्फीदेखील सोशल मीडियावर अपलोड करायला चुकत नाही. 
काही लोकं तर विनाकारण आपल्या प्रत्येक पोस्टवर लोकांना टॅग करत सुटतात. यामुळे बरेच लोकं त्रस्त होतात आणि शेवटी आपणास ब्लॉक किंवा अनफ्रेंड करतात. 

बहुतेक मुलं फेसबुकवर मुलींचे अकाऊंट दिसले की सकाळ, संध्याकाळ गुडमॉर्निंग, गुड नाइट, हाय, हॅलो असे मॅसेच पाठवून त्रास देतात. यामुळे समोरची मुलगी त्रस्त होऊन जाते.

कित्येक जणांना सोशल मीडियावर शायर बनण्याची मोठी हौस असते. स्वत:ला एकही शेर येत तर नाही, कोणाचीही शायरी कॉपी पेस्ट करुन नाहक इतरांना त्रास दिला जातो. जर शायरीच करायची असेल तर आपल्या गर्लफ्रेंडच्या समोरासमोर करावी. नाहक इतरांना त्रास नको.   

Web Title: Girls do such unfriendly behavior on Facebook!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.