स्मार्टफोनला द्या हटके लूक...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2016 06:30 PM2016-11-24T18:30:14+5:302016-11-24T18:30:14+5:30

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून, तो जलदगतीने काम करावा आणि त्यात बदल घडून इतरांपेक्षा त्याचा हटके लूक दिसावा असे अनेकदा वाटते. मात्र, तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती नसल्याने आपला स्मार्टफोन आहे तसाच दिसतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपला फोनचा लूकदेखील बदलायला हवा.

Give Smartphones to the Luc ...! | स्मार्टफोनला द्या हटके लूक...!

स्मार्टफोनला द्या हटके लूक...!

Next
ong>-Ravindra More

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन असून, तो जलदगतीने काम करावा आणि त्यात बदल घडून इतरांपेक्षा त्याचा हटके लूक दिसावा असे अनेकदा वाटते. मात्र, तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती नसल्याने आपला स्मार्टफोन आहे तसाच दिसतो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपला फोनचा लूकदेखील बदलायला हवा. आजच्या सदरात आपल्या स्मार्टफोनला हटके लूक येण्यासाठी काय करावे याबाबत जाणून घेऊ या...

स्मार्टफोनच्या तंत्रज्ञानात दिवसेंदिवस झटपट बदल होत असल्याने दर सहा महिन्यांनी नवा फोन घ्यावा अशी इच्छा उफाळून येते. मात्र प्रत्येकालाच नवीन फोन घेणे शक्य नसते. अशावेळी नवीन फोन घेण्यापेक्षा आपल्या फोनचा ‘इंटरफेस’ लॉँचरच्या साह्याने आपण फोनची नवलाई वाढवू शकतो. 

या अ‍ॅँड्रॉइड लॉँचरमुळे आपण आपल्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्स, इतर सुविधा आणि कॉलिंग आॅप्शनचे नियोजन करु शकता. तसेच त्याची कार्यक्षमतादेखील वाढवू शकता. शिवाय स्क्रीनची रंगसंगती, फॉँट, फोल्डरचे आयकॉन आदी बदलून फोनची आकर्षकता वाढवून हटके लूक देऊ शकता. या अँड्रॉइड लाँचरशी संबंधित अनेक अ‍ॅप्स गुगल प्लेवर पाहायला मिळतात. अशाच काही लाँचर्सची माहिती खाली दिली आहे. 

अपेक्स लाँचर
स्मार्टफोन धारकांकडून सर्वात जास्त वापरले जाणारे ‘अ‍ॅपेक्स लॉँचर’ होय.  हे लाँचर सर्वात जुने असून थोडेफार लॉलीपॉप अँड्रॉइड आॅपरेटिंग सिस्टीमसारखे काम करते. या अ‍ॅपमध्ये तुम्ही एकाच वेळेला अनेक अ‍ॅप्सचे आयकॉन नियोजित करू शकता. या अ‍ॅपमध्ये अनेक थीम्स उपलब्ध असून हे अ‍ॅप कोणत्याही स्मार्टफोनमध्ये व्यवस्थित काम करू शकते. 

अ‍ॅक्शन लाँचर ३
सर्वाेत्तम लॉँचर म्हणून याची गणना होते. यातील क्विकथीम या फीचरमध्ये आपला स्मार्टफोनच्या वॉलपेपरमधील एखादा रंग उचलून ‘सर्च बार’ त्याच्याशी एकरुप करता येतो. शिवाय  शटर्स आणि कव्हर्स असे वेगवेगळे फीचर्स देखील आहेत. ‘कव्हर’ नावाचे फीचर तुम्हाला एका फोल्डरमधून दुसºया फोल्डरमध्ये जाण्याचे काम सोपे आणि जलद करते. तसेच ‘शटर्स’ हे फीचर तुम्हाला एका अ‍ॅपचा उपयोग झाल्यावर लगेच दुसरे अ‍ॅप वापरण्याची प्रक्रिया सुलभ करते.

होला लाँचर
हे लॉँचर आपण सर्वात जास्त वापरत असेलेले अ‍ॅप्स स्क्रीनवर नियोजित करण्यास तसेच स्क्रीनवर दाखविण्यास मदत करते. विशेष म्हणजे स्मार्टफोनसाठीचे उपयोगी असे वैशिष्ट्ये यात असून, यामुळे स्मार्टफोन जलदगतीने काम करतो. तुम्ही तुमचे अ‍ॅप अगदी चटकन दाखवू अथवा लपवू शकता. या अ‍ॅपमध्ये थीम्स, आयकॉन्स, स्मार्टफोल्डर्स आणि हवामानाचे अंतर्गत अ‍ॅप यांचा समावेश आहे.

एरो लाँचर
मायक्रोसॉफ्टचे हे लॉँचर विण्डोज सारखे दिसत असून, त्याला खूपच प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हे अ‍ॅप तिसºया स्थानावर आहे. शॉर्टकट कीजबरोबरच तुमचे काहीच वेळापूर्वी डायल केलेले क्रमांक, जास्तवेळा वापरलेले अ‍ॅप्स, रिमायण्डर्स, तुमची कागदपत्रे तुमच्या स्क्रीनवर दिसतात. ज्या लोकांना विण्डोज वापराची जास्त सवय आहे ते या लाँचरला प्राधान्य देतील हे नक्की.


लाँचर ८
अ‍ॅँड्रॉइडशी काही संबंध नसलेले हे सर्वात वेगळे अ‍ॅप आहे. या लॉँचरमुळे आपल्या फोनचा अ‍ॅँड्रॉइड लूक विण्डोज सारखा दिसतो. तसेच या अ‍ॅपमुळे तुम्ही तुमच्या विजेट्सला विण्डोज प्रकारात बदलू शकता. यामुळे तुमचा फोन विण्डोजसारखा दिसेल पण तो असेल अँड्रॉइड. यामध्ये तुमच्या स्मार्टफोनचे काम सोपे करण्याच्या अनेक सुविधा आहेत.   

Web Title: Give Smartphones to the Luc ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.