‘गो विथ गोल्डन’
By admin | Published: April 5, 2017 05:46 PM2017-04-05T17:46:00+5:302017-04-05T17:46:00+5:30
लग्नसमारंभात, छोट्या मोठ्या पार्टीत स्पेशल दिसायचं असेल तर ‘गो विथ गोल्डन’ एवढा नियम पाळा. लूक हिट झालाच म्हणून समजा.
- मोहिनी घारपुरे-देशमुख
लग्नसमारंभात, छोट्या मोठ्या पार्टीत स्पेशल दिसायचं असेल तर ‘गो विथ गोल्डन’ एवढा नियम पाळा. लूक हिट झालाच म्हणून समजा.
सोनेरी रंगाचा थाट काही न्याराच असतो. त्यातही विशेषत: स्वत:च्या लग्नात सोनेरी रंगाचा पोषाख परिधान केला तर वधूच्या सौंदर्याला वेगळाच उठाव येतो. पण हा सोनेरी रंग परिधान करायचेही काही नियम आहेत ते पाळले तर अंगावरचा सोनेरी रंग स्वत: चमकतो आणि आपल्यालाही चमकवतो.
1) सोनेरी रंगाबरोबर अन्य रंगांचं कॉम्बिनेशन, लायनिंग आणि स्टोन्स किंवा लेदर वर्क त्यावर असेल तर ते आणखीनच खुलून दिसतं. सोनेरी रंग शक्यतो निमगोऱ्या किंवा डस्की (सावळा) रंगाच्या त्वचेवर शोभतो. त्यामुळे सर्वप्रथम हा रंग आपल्या त्वचेवर खुलतोय की नाही ते तपासून त्यानंतरच हा बोल्ड रंग कॅरी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा. तसेच हा रंग कॅरी करताना त्यातील आपल्या रंगावर खुलणारीच शेड सिलेक्ट करावी.
2) सोनेरी रंग हा शाही रंग म्हणून ओळखला जातो. त्यामुळेच तो कॅरी केल्यावर तुमचा लुक देखील राजेशाहीच होणार यात वादच नाही.
3) या रंगाच्या पोशाखाबरोबर सोनेरी, जरीची कलाकुसर असलेली मोजडी आणि त्याच प्रकारे वर्क केलेल्या क्लच कॅरी कराव्यात.
4) सोनेरी रंगावर कुंदनच अधिक खुलून दिसतात. त्यामुळे आभुषणं शक्यतो कुंदनचीच वापरावीत.
5) मेटालिक किंवा ब्राऊन कलरचा मेकअप या पोषाखावर तर फारच सुंदर दिसतो.
6) लग्न समारंभ, पार्टी किंवा अन्य कोणत्याही प्रसंगी या रंगाचा पारंपरिक अथवा पाश्चात्य धाटणीचा पेहराव लक्ष वेधून घेतो. सोनेरी रंगाचा दबदबाच आहे तसा!