​शेळ्या असतात कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2016 05:29 PM2016-07-14T17:29:50+5:302016-07-14T22:59:50+5:30

लंडनमधील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार शेळ्या या कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव असतात.

Goats are more potty than dogs | ​शेळ्या असतात कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव

​शेळ्या असतात कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव

Next
ref="http://www.cnxdigital.com/article/lifestyle/trends/5539">यापूर्वी जसे की आम्ही तुम्हाला सांगितलेच आहे की, आपल्याला आपला पाळवी कुत्रा कितीही प्रेमळ वाटत असला तरी त्याला मिठी मारलेली बिल्कुल आवडत नाही.

मग कशाला भाव द्यायचा अशा कुत्र्याला, असा जर तुमच्या मनात विचार आला असेल आणि तुम्ही दुसरा प्राणी पाळण्याची इच्छा बाळगुन असाल तर शेळी तुमच्यासाठी बेस्ट पर्याय आहे.

लंडनमधील संशोधकांनी केलेल्या अध्ययनानुसार शेळ्या या कुत्र्यांपेक्षा जास्त पाळीव असतात. अनेक वर्षांपासून आपला असा गैरसमज होता की, शेळ्या मेंढ्यांप्रमाणेच अल्प बुद्धीमत्तेच्या असतात. तसे पाहिले गेले तर मानवाने दहा हजार वर्षांपूर्वी प्राण्यांना पाळण्याची सुरुवातच मुळात शेळ्यांपासून केली होती.

परंतु नव्या संशोधनातून असे समोर आले की, शेळ्या कुत्र्यां एवढ्याच हुशार असतात. ते नाते निर्माण करू शकतात, अडचणींवर मात क रू शकतात तसेच कुत्र्यांप्रमाणेच आपल्याशी सलगी क रण्यास त्या समर्थ असतात. शिवाय आपल्या पिण्यायोग्य असे दुध शेळ्यांपासून मिळते, ज्यामुळे त्या कुत्र्यांपेक्षा सरस ठरतात.

म्हणजे कुत्र्याची सर्वोत्तम पाळीव प्राणी म्हणून असलेली मक्तेदारीला टक्कर देणारा शेळीचा पर्याय समोर आला आहे. 

Web Title: Goats are more potty than dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.