‘द गॉडफादर’ हाऊस काढले विक्रीला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2016 08:44 AM2016-09-20T08:44:29+5:302016-09-20T14:14:29+5:30
लॉस एंजल्स येथील ‘बेव्हरली हिल्स’ भागातील या घराची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल १९५ मिलियन डॉलर्स म्हणजे १३०० कोटी रुपये एवढी आहे.
Next
ज गतिक सिनेमातील अभिजात म्हणून गणल्या जाणार्या ‘द गॉडफादर’ या चित्रपटात दाखविण्यात आलेले घर सध्या विक्रीस उपलब्ध झाले आहे. लॉस एंजल्स येथील ‘बेव्हरली हिल्स’ भागातील या घराची किंमत थोडी थोडकी नसून तब्बल १९५ मिलियन डॉलर्स म्हणजे १३०० कोटी रुपये एवढी आहे.
‘गॉडफादर’ चित्रपटातील घोड्याच्या हत्येचा प्रसिद्ध सीन या घरात शूट झाला होता. त्याबरोबरच व्हिटनी ह्युस्टनच्या पदार्पणातील ‘द बॉडीगॉर्ड’ (१९२२) या सिनेमाची शुटींगसुद्धा याच घरात झाली होती. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनडी आणि त्यांची पत्नी जॅकलीन यांनी त्यांचा हनीमूनदेखील याच घरात साजरा केला होता.
‘हूवर डॅम’चा आर्किटेक्ट गॉर्डन कौफमन यांनीच हे घर डिझाईन केले असून ५० हजार एकर जागेवर ते वसलेले आहे. त्यामध्ये १९ बेडरुम्स व स्वीट्स, एक आॅलिम्पिक साईज स्विमिंगपूल, टेनिस कोर्ट, कमर्शिअल ग्रेड किचन आणि एक हजार पाहुण्यांच्या क्षमतेचे ओपन टेरेसचा सामावेश आहे.
एकेकाळी मीडिया सम्राट विलियम रॅन्डॉल्फ हर्स्ट आणि अभिनेत्री मेरियन डेव्हिज हे या घराचे मालक राहिले आहेत. सर्व आलिशान सुख-सुविधांनीयुक्त या घरात दोन मजली ग्रंथालय, स्पा आणि ३२ फूट बिलियर्डस् रुम आहे. त्याबरेबरच लँडस्केप आर्किटेक्ट पॉल थिएन याने सजवलेले गार्डन या घराची शोभा वाढवते.