​लग्नासाठी मुली पाहायला जाताय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2016 04:12 PM2016-11-26T16:12:48+5:302016-11-26T16:12:48+5:30

सध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे. मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील एक रोमांचक अनुभव असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये तर तरुणांसाठी एखाद्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जाणे हे अविस्मरणीय ठरते.

Going to see girls for marriage! | ​लग्नासाठी मुली पाहायला जाताय!

​लग्नासाठी मुली पाहायला जाताय!

googlenewsNext
ong>-Ravindra More

सध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे. मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील एक रोमांचक अनुभव असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये तर तरुणांसाठी एखाद्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जाणे हे  अविस्मरणीय ठरते. बऱ्याचदा तिच्या घरच्यांना इंप्रेस करताना काही गोष्टी जाणवत नाहीत. पण, त्यांचा तुमच्या भविष्यावर परिणाम होत असतो. कारण लग्न हे आयुष्यभरासाठीचे बंध असून अशावेळी योग्य निर्णय घेणे तेवढेच महत्त्वाचे आहे. मुली पाहावयास जाताना काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया...

मुलीच्या घरी गेल्यानंतर तिच्या घरचे तुमच्याशी संवाद करताना कसे वागतात किंवा बोलतात यांचे नीट निरिक्षण केल्यास ते भविष्यात तुमच्यासोबत कसे वागतील हे आपणास समजू शकते. यासाठी खाली काही टिप्स दिलल्या आहेत. 

- बऱ्याचदा मुलींच्या घरच्यांकडून एखादा मुद्दा जबरदस्तीने पटविण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबीकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीवर तिच्या घरातील संस्काराचा पगडा असतो. तिच्या किंवा त्याच्या वागण्या-बोलण्यातून घरातील संस्कार दिसत असतात. घरातील व्यक्तींच्या चांगल्या व वाईट सवयी देखील तुमच्यामध्ये नकळत उतरत असतात. जर तिच्या घरचे तुम्हाला एखाद्या गोष्टीबाबत जबरदस्ती करीत असतील तर या स्थळाबाबत पुढे जाण्याचा विचार थांबवा. किंवा जर तुम्ही त्यांना अजून एक संधी देण्याचा विचार करीत असाल तर त्या मुलीला याबाबत स्पष्टपणे तुमचे मत सांगा. 

- लग्नानंतर दोघांना आयुष्यभरासाठी एकत्र राहायचे आहे. यामुळे लग्नापूर्वी बरेच निर्णय दोघांनी मिळून घेणे आवश्यक असते. मात्र, बऱ्याचदा दोघांबाबतचे निर्णय घेताना ती किंवा तो जर सतत घरच्यांचे मत घेत असेल तर अशावेळी आपण सावध व्हायला हवे. कारण भविष्यात तुम्हा दोघांनाही सतत तिच्या घरच्यांचे ऐकावे लागू शकते. यासाठी तुमच्या पुढील आयुष्यातील काही खास निर्णय तुम्ही दोघेच मिळून घेणार आहोत हे स्पष्ट सांगा. यामुळे भविष्यात उद्भविणाऱ्या समस्यांना आळा बसेल. 

- आपण पहिल्यांदाच मुलीच्या घरी गेलो असेल तर पहिल्या भेटीत अस्वस्थता वाटणे सहाजिकच आहे, मात्र नंतरच्या भेटीतही तिच्या घरच्यांसोबत आपलेपणा वाटत नसेल तर त्याचा त्रास तुम्हाला या नातेसंबधात पुढे होऊ शकतो. यासाठी त्यांसोबत मोकळेपणाने बोलण्याचा प्रयत्न करा. अशाने त्यांचाही स्वभाव तुम्हाला कळेल आणि नंतरचे त्यांच्यासोबतचे संबंध जोपासताना त्रास होणार नाही. 

-  लग्नकार्यात किंवा तत्पूर्वी थोड्याफार प्रमाणात गमतीजमती ठिक आहे, मात्र, त्याचे रुपांतर थट्टेत  प्रमाणाबाहेर होत असेल आणि तिच्या घरचे तुमची सतत चेष्टा करीत असतील किंवा तिच्या घरची इतर मंडळी हसतखेळत तुमचा अपमान करीत असतील तर त्याबाबत तुम्ही तुमच्या भावी पत्नीसोबत बोला. तिचे याबाबत काय मत आहे यावरून तुम्ही तुमच्या भविष्यातील पुढील निर्णय घ्या. 

- सध्या घटस्पोटांचे प्रमाण वाढले असून या परिस्थितीला बरेच प्रसंग कारणीभूत आहेत. त्यात लग्नापूर्वी एकमेकांना जाणून न घेणे, विचारातील विसंगता, कौटुंबीक असमानता आदी बाबी पाहावयास मिळतात. या समस्यांवर घटस्पोट हा एकमेव पर्याय नसून त्यासाठी लग्नापूर्वी आणि लग्नानंतर दोघे कुटुंबांनी काळजी घेतल्यास घटस्पोटासारखा प्रसंग ओढवणार नाही. 

Web Title: Going to see girls for marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.