चांगल्या बेडशीटमुळेही येते सुखाची झोप. फक्त बेडशीट निवडताना या चार गोष्टींचा नक्की विचार करा!

By admin | Published: May 25, 2017 07:14 PM2017-05-25T19:14:11+5:302017-05-25T19:14:11+5:30

शांत झोपेसाठी योग्य बेडशीट खूप महत्वाची गुंतवणूक असते. बेडशीट निवडताना या टिप्स तुम्हाला नक्की मदत करू शकतील!

A good bedsheet also comes from sleepiness. Just think of these four things when choosing bedsheets! | चांगल्या बेडशीटमुळेही येते सुखाची झोप. फक्त बेडशीट निवडताना या चार गोष्टींचा नक्की विचार करा!

चांगल्या बेडशीटमुळेही येते सुखाची झोप. फक्त बेडशीट निवडताना या चार गोष्टींचा नक्की विचार करा!

Next

 

-सारिका पूरकर-गुजराथी

दिवसभराची घरातली आणि आॅफिसमधली दगदग, ताण-तणाव, चिंता या साऱ्यांपासून थोडे निवांत क्षण देणारी जागा म्हणजे घरातील बेडरुम. एक पर्सनल, स्वत:ची, स्वत:ला वेळ देता येणारी खोली. साहजिकच ही खोली सजावटीपेक्षाही तुम्हाला कम्फर्ट कसा मिळेल यादृष्टीनं परिपूर्ण असायला हवी. या कम्फर्ट देणाऱ्या घटकांमध्ये सर्वात महत्वाचा असतो तो बेड. बेडवर पडल्या-पडल्या तुम्हाला रिलॅक्स फील मिळायला हवा. आता हा फील हवा असेल तर त्यासाठी बेडदेखील प्रसन्न ठेवायला हवा नाही का? आणि त्यासाठीच योग्य बेडशीटची निवड खूप महत्वाची ठरते. बेड म्हणजे फक्त सात-आठ तास झोपण्यासाठीच नसतो तर एरवीही तुम्हाला बघताच क्षणी शांततेची अनुभूती देणारा घटक असतो. आणि म्हणूनच शांत झोपेसाठी योग्य बेडशीट खूप महत्वाची गुंतवणूक असते. महागड्या मॅट्रेस बेडवर घातल्या परंतु बेडशीटच योग्य नसेल तर सजावटीसोबतच झोपेचंही खोबरं झालंच म्हणून समजा. बेडशीट निवडताना या टिप्स तुम्हाला नक्की मदत करू शकतील!

बेडशीट निवडताना

१) फेब्रिकची योग्य निवड बेडशीट विविध फेब्रिकपासून बनतात. त्यापैकी तुम्हाला कोणतं फेब्रिक अधिक आरामशीर, आल्हाददायक वाटतं ते ठरवा. बेडशीट सहसा कॉटन, सॅटिन, सिल्क या तीन प्रमुख फेब्रिकपासून बनतात. सर्वाधिक पसंती कॉटनच्या बेडशीट्सलाच असते. कारण त्याचा मऊपणा सर्वांनाच जास्त भावतो. मात्र कॉटनमध्येही अनेक प्रकार असतात. ते देखील ट्राय करायला हवेत. कॉम्बड कॉटन हे सर्वात मऊसूत असतं. सुपिमा कॉटन बेडशीट्स लहान मुलं, कॉलेज गोर्इंग जनरेशनसाठी बेस्ट आॅप्शन ठरते . मस्लिन कॉटन हे थोडे कमी मऊ असतं परंतु आकर्षक प्रिंट्समुळे हे बेडशीट सुंदर दिसतं. याव्यतिरिक्त इजिप्तियन, जर्सी कॉटन, फ्लॅनेल कॉटनपासूनही बेडशीट बनतात. सॅटिन किंवा सिल्कचे बेडशीट तुम्हाला रॉयल, शाही लूक देते. शिवाय सॅटिन/सिल्कच्या बेडशीट्समुळे कोणत्याही अ‍ॅलर्जीचा त्रास होत नाही. हे बेडशीट्स दीर्घकाळासाठी तेवढेच सुंदर दिसतात, कारण याचे रंग जात नाही, प्रिंट खराब होत नाही. उन्हाळ्यात या बेडशीट्स घामाच्या त्रासापासूून वाचवतात, उष्णता कमी करतात. २०१७ मध्ये मात्र लिनन ट्रेंंड हिट ठरलाय. थोडा महागडा पर्याय आहे हा परंतु कम्फर्ट आणि लूक या बाबतीत एकदम वरचढच आहे.

 

                          

Web Title: A good bedsheet also comes from sleepiness. Just think of these four things when choosing bedsheets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.