Good News : भारतात सुुरु झाल्या ‘गूगल प्ले म्युझिक’च्या सर्व सेवा, एक महिने फ्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2017 09:57 AM2017-04-06T09:57:50+5:302017-04-06T15:27:50+5:30
विशेष म्हणजे पहिल्या एक महिन्यापर्यंत ट्रायल बेसवर आपण या अॅपचा मोफत वापर करु शकता.
Next
गूगलने भारतात शेवटी ‘गूगल प्ले’ म्युझिक सेवा पूर्णपणे लॉन्च केलीच. अगोदर कंपनीने या सेवेला फक्त अर्धवटच लॉन्च केले होते. आता आपण याद्वारे इतर म्युझिक अॅपसारखे गाणे सहज ऐकू शकणार.
विशेष म्हणजे पहिल्या एक महिन्यापर्यंत ट्रायल बेसवर आपण या अॅपचा मोफत वापर करु शकता. मात्र यानंतर प्रतिमहिना ८९ रुपये द्यावे लागतील. या आॅफरचा फायदा घेण्यासाठी ४५ दिवसाच्या आत साइन करावे लागेल. मात्र कंपनीने पुढील सब्स्क्रिशन चार्जच्या बाबतीत अजूनपर्यंत खूलासा केला नाही.
या अगोदर प्ले म्युझिकवर गाण्यासाठी १० रुपये आणि अल्बमसाठी १०० रुपये द्यावे लागायचे. मात्र आता लाखो गाणे आणि अल्बममधून आपण म्युझिक ट्रॅक्स ऐकू शकता. आॅनलाइन स्ट्रीमिंगशिवाय येथे आपण गाणे सेव पण करू शकता.
गूगल प्ले म्युझिक सोबत फ्री क्लाउड स्टोरेजदेखील देत आहे. सब्सक्रिशनसोबतच यूजर्सला ५० हजार ट्रॅक्सला क्लाउडवर स्टोर करु शकता. म्हणजेच यानंतर कधीही कुठेही गाणे ऐकू शकता. मात्र यासाठी प्ले म्युझिक अॅपचा वापर करावा लागेल.