Good News : आधार कार्डमध्ये चुक किंवा अपूर्ण माहिती असेल तर असे करा घरीच अपडेट !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2017 12:47 PM2017-04-15T12:47:30+5:302017-04-15T18:17:30+5:30
या सोप्या पद्धती वापरून आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये करेक्शन करु शकता.
सरकारने बॅँक अकाउंट आणि पॅन कार्ड सारख्या आवश्यक सुविधांसाठी आधार कार्डला अनिवार्य केले आहे. त्यामुळे सर्वांचेच आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर आधार कार्ड बनविलेले असेल तर त्यातील माहिती अचुक आहे का याची खात्री करुन घ्या. जर त्यात दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या माहितीला दुरुस्तही करु शकता. यासाठी आपणाजवळ दोन पर्याय उपलब्ध आहेत.
पहिला म्हणजे आपण जवळच्या आधार सेवा केंद्रात जाऊन करेक्शन क रु शकता. ज्या माहितीची दुरुस्ती करायची आहे, त्यासंबंधीचे कागदपत्रे मुळप्रतित सोबत असणे आवश्यक आहे. दुसरा पर्याय म्हणजे आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये दुरुस्ती करु शकतो.
आॅनलाइन दुरुस्तीसाठी आपणास सर्वप्रथम आधारच्या आॅफिशियल वेबसाइटला भेट द्यावी. साइटवर गेल्यानंतर ‘आपकी आधार’ वर क्लिक करावे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर लगेचच एक पेज ओपन होईल. त्या पेजच्या खाली डाव्या बाजूला ‘अपडेट युवर आधार डेट’ वर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ‘अपडेट डाटा आॅनलाइन’ लिंक दिसेल. या पेजवर आपणास आधार नंबर टाइप करावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर आपला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर या मोबाइल नंबरवर एक ‘ओटीपी’ येईल. या ‘ओटीपी’ला निर्धारित जागेवर भरल्यानंतर आपले लॉगिन होईल.
यशस्वीरित्या लॉगिन झाल्यानंतर ‘डाटा अपडेट रिक्वेस्ट’वर क्लिक करुन आपल्या माहितीत बदल करु शकता. आपण ज्या माहितीत बदल करीत आहात, त्या संबंधीचे कागदपत्रेदेखील अपलोड करावे. दुरुस्ती आणि कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर ‘सबमिट’चे बटन क्लिक करावे. सबमिट केल्यानंतर ‘अपडेट स्टेटस’ वर जाऊन आपला आधार नंबर आणि यूआरएन टाका. हे सर्व झाल्यानंतर आपल्याला ‘युवर रिक्वेस्ट कंप्लिट सक्सेसफुली’ दिसेल. हा मॅसेज दिसल्यानंतर आपण साइन आउट करू शकता.
या सोप्या पद्धती वापरून आपण आॅनलाइन आपल्या आधार कार्डामध्ये करेक्शन करु शकता.