Good News : ...आता ‘एसएमएस’ने जोडा आधार आणि पॅन कार्ड !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2017 08:31 AM2017-05-31T08:31:33+5:302017-05-31T14:01:33+5:30

आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करुन नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया अजून सोपी करुन आता एक एसएमएस करुनही आधार आणि पॅन कार्ड जोडता येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे.

Good news: ... Now add SMS and support for PAN card! | Good News : ...आता ‘एसएमएस’ने जोडा आधार आणि पॅन कार्ड !

Good News : ...आता ‘एसएमएस’ने जोडा आधार आणि पॅन कार्ड !

Next
ार कार्ड आणि पॅन कार्ड जोडण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करुन नागरिकांच्या सुविधेसाठी ही प्रक्रिया अजून सोपी करुन आता एक एसएमएस करुनही आधार आणि पॅन कार्ड जोडता येणार असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. नागरिकांनी आपल्या मोबाइलवरुन पॅन क्रमांक, आधार क्रमांक आपल्या नावासह टाईप करून 567678 किंवा 56161 क्रमांकावर एसएमएस केल्यास काही वेळातच त्यांचे पॅन आणि आधार कार्ड एकमेकांशी जोडले जाईल. याबाबत अनेक राष्ट्रीय वर्तमानपत्रांमध्ये याबाबत जाहिरात प्रसिद्ध करुन जनजागृती निर्माण केली जात आहे.

देशातील सर्व नागरिकांना येत्या १ जुलैपर्यंत पॅन कार्ड म्हणजेच पर्मनंट अकाऊंट नंबर आपल्या आधार काडार्सोबत जोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे न करणाºया नागरिकांचे पॅन कार्ड रद्द केले जाणार असून ते कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी अपात्र असेल असेही सरकारने स्पष्ट केले आहे. प्राप्तिकर संकलन वाढवत करचुकवेगिरी करणºया लोकांना लगाम घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्राप्तिकराशी निगडीत सुविधांचा लाभ घेण्यासाठी या दोन्ही क्रमांकांची नोंदणी आवश्यक असल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. नव्या पॅन काडार्साठी अर्ज करताना आधार क्रमांक नमूद केल्यास ते एकमेकांशी जोडले जातील. नागरिकांना आधार क्रमांकासह पॅन कार्ड नव्याने छापण्याचीदेखील सुविधा उपलब्ध आहे.

नागरिकांना विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरुनदेखील ही जोडणी करता येणार आहे. संकेतस्थळावर दोन लिंक उपलब्ध आहेत. पहिल्या लिंकवर क्लिक करुन पॅन काडार्तील चुका दुरुस्त करण्यासाठी नव्या पॅन कार्डसाठीदेखील अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे, आधार कार्डावरील तपशीलात बदल करण्यासाठी दुसरी स्वतंत्र लिंक उपलब्ध आहे.

Also Read : ​Alert : असे केले नाही तर १ जुलै नंतर तुमचे पॅनकार्ड होऊ शकते रद्द !
                  : ​ALERT : काहीच दिवस शिल्लक : आपल्या बॅँक अकाउंटशी आधार लिंकिंग करा, अन्यथा होईल ब्लॉक !

Web Title: Good news: ... Now add SMS and support for PAN card!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.