GOOD NEWS : भारतात येत्या सहा महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 09:54 AM2017-04-04T09:54:15+5:302017-04-04T15:25:02+5:30

२०० मिलियनपेक्षाही जास्त यूजर्ससोबत सर्वात मोठी बाजारपेठ असणारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लवकरच भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत आहेत.

GOOD NEWS: 'Pay to Pay' payment facility through Whatsapp in India in the next six months! | GOOD NEWS : भारतात येत्या सहा महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा !

GOOD NEWS : भारतात येत्या सहा महिन्यात व्हॉट्सअ‍ॅपद्वारे ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा !

Next
ong>-Ravindra More
२०० मिलियनपेक्षाही जास्त यूजर्ससोबत सर्वात मोठी बाजारपेठ असणारे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लवकरच भारतात ‘पियर टू पियर’ पेमेंटची सुविधा सुरु होणार असल्याचे संकेत आहेत. 
एका भारतीय सदस्यता असेलल्या मीडिया कंपनीने प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, भारतात लवकरच येत्या सहा महिन्यात यूजर्सदरम्यान पेंमेंटच्या सुविधेला सक्षम करण्यासाठी सरकारद्वारा समर्थित यूपीआय, एक क्रॉस-बॅँकद्वारे पेमेंट देयक प्रणालीचा उपयोग करणारी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 
भारत व्हॉट्सअ‍ॅपसाठी एक महत्त्वपूर्ण देश आहे आणि हाच मुद्दा डिजिटल इंडियाकडे वाटचालीस योगदान ठरू शकतो. यासाठी अजून ही योजना सक्षम होण्यासाठी अशाच पद्धतीच्या डिजिटल इंडियाला हातभार लावण्यासाठी तत्पर काही कं पन्यांसोबत काम करण्यास व्हॉट्सअ‍ॅप उत्सुकदेखील आहे. 
फेब्रुवारीमध्ये भारतात आलेले व्हॉट्सअ‍ॅपचे सहसंस्थापक ब्रायन एक्टन यांनी याबाबत घोषणा केली होती. यावेळी देशाचे आयटी मंत्रीदेखील उपस्थित होते.  
फेसबुकने आपल्या मॅसेंजर अ‍ॅपद्वारे अशी सुविधा यूएसमध्ये काही दिवसांपूर्वी सुरू केली होती, मात्र व्हॉट्सअ‍ॅपची ही सुविधा भारतात अधिक ट्रान्सफार्मिव्ह होऊ शकते, कारण भारतात मॅसेंजर खूपच लोकप्रिय आहे. भारतात क्रेडिड कार्डचा वापरही तसा कमी आहे, मात्र ई-कॉमर्सच्या सुविधेसाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमाने अगोदरपासूनच फ्लेटफॉर्म तयार झाला आहे.  

Web Title: GOOD NEWS: 'Pay to Pay' payment facility through Whatsapp in India in the next six months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.