​भारतामध्ये वाढतेय प्रोफेशनल नेटवर्किंगचे प्रस्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2016 11:48 AM2016-08-10T11:48:31+5:302016-08-10T17:31:48+5:30

भारतात लिंक्डइनचे ३.७ कोटी यूजर्स आहेत. लिंक्डइन यूजर्सच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

Growing professional networking in India | ​भारतामध्ये वाढतेय प्रोफेशनल नेटवर्किंगचे प्रस्थ

​भारतामध्ये वाढतेय प्रोफेशनल नेटवर्किंगचे प्रस्थ

Next
शल नेटवर्किंगचा बोलबाला तर सगळीकडेच आहे परंतु आता प्रोफेशनल नेटवर्किंगचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विशेष करून भारतामध्ये ‘लिंक्डइन’सारख्या प्रोफेशनल नेटवर्किंग वेबसाईटची युजर्स संख्या वाढली आहे. कंपनीने जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार द. आशिया-पॅसिफिक विभागात (एपीएसी) कंपनीने शंभर मिलियन (दहा कोटी) यूजर्सचा टप्पा ओलांडला आहे.

गेल्या दोन वर्षांत कंपनीचा यूजरबेस दुप्पटीने वाढला आहे. संपूर्ण जगाचा विचार केला असता कंपनीच्या एकूण ४५ कोटी यूजर्सपैकी २२ टक्के यूजर्स हे या द. आशिया-पॅसिफिक विभागातील देशातील आहेत. यामध्ये एकट्या भारतात लिंक्डइनचे ३.७ कोटी यूजर्स आहेत. लिंक्डइन यूजर्सच्या बाबतीत अमेरिकेनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.

कंपनीच्या आशिया पॅसिफिक व जपान विभागाचे व्यवस्थापकीय संचालक आॅलिव्हिएर लेग्रँड यांनी माहिती दिली की, सध्या ज्याप्रकारे कंपनीची वाटचाल चालू आहे, त्यानुसार लिंक्डइन जगभरातील प्रोफेशनल यूजर्सना एकत्र आणून त्यांना वैविध्यपूर्ण आर्थिक संधी मग ते नव्या नोकरीच्या स्वरुपात किंवा प्रोमोशन किंवा इतर व्यावसायिक संधीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी अधिक सक्षम झाली आहे.

चीनमध्ये २.३ कोटी, आॅस्ट्रेलिया ८० लाख, इंडोनेशिया ६० लाख, फिलिपाईन्स ४० लाख मलेशिया ३० लाख आणि सिंगापूरमध्ये दहा लाख यूजर्स आहेत.

Web Title: Growing professional networking in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.