GST पूर्वी स्मार्टफोनच्या किमतींवर मोठी सवलत !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2017 10:04 AM2017-05-27T10:04:04+5:302017-05-27T15:34:04+5:30
१ जूलैपासून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू होत असून याचा परिणाम स्मार्टफोनच्या किंमतींवरही होणार आहे. मात्र तत्पूर्वी मोबाइल ब्रॅण्ड्स आणि रिटेलर्स आपला जुना माल खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याची शक्यता आहे.
Next
१ जूलैपासून वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी लागू होत असून याचा परिणाम स्मार्टफोनच्या किंमतींवरही होणार आहे. मात्र तत्पूर्वी मोबाइल ब्रॅण्ड्स आणि रिटेलर्स आपला जुना माल खपविण्यासाठी मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्याची शक्यता आहे.
या डिस्काऊंट आॅफर्स आॅनलाइन आणि आॅफलाइन अशा दोन्ही पद्धतीने काही हँडसेट कंपन्या देऊ शकतात तसेच रिटेलर्सदेखील आपल्या किमतीत कपात करू शकतात. असे या क्षेत्रातील विश्लेषकांचे म्हणणे आहे. जूनच्या मध्यापासून ते शेवटच्या तारखेपर्यंत ब्रॅण्ड्स आपल्या डिस्काऊंट आॅफर्स देण्याची शक्यता असल्याचे इंटरनॅशनल डाटा कॉपोर्रेशनचे भारतातील वरिष्ठ विश्लेषक नवकेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. हा डिस्काऊंट १० टक्क्यांपर्यंत असू शकतो, असा काऊंटरपॉइंट रिसर्चचा अंदाज असून कंपनीचे सहकारी संचालक तरुण पाठक सांगतात की, ब्रॅण्ड्सनी वितरकांना माल पाठविण्यास सुरूवात केली आहे. मात्र GST दरातील अनिश्चिततेमुळे वितरकांनी तो माल पुढे रिटेलर्सना पाठविणे थांबविले होते. पण GST दर ठरविणाऱ्या समितीने मोबाइल हँडसेट आणि ते बनविण्यासाठी लागणारे पार्ट्स यांवर १२ टक्के कर निश्चित केल्यामुळे हँडसेट सध्याच्या किमतीच्या ४-५ टक्के महाग होणार आहेत. त्यामुळे वितरक हा जुना माल स्वत:कडे ठेवू इच्छित नाहीत.
मात्र ज्या मोबाइल कंपन्यांच्या हँडसेट विक्री सध्या चांगली नाही, त्याच कंपन्या या डिस्काऊंट आॅफर्स देऊ शकतात, असे मत रिसर्च फर्म सीएमआरचे मुख्य विश्लेषक आणि महाव्यवस्थापक फैजल कावूसा व्यक्त करतात. या कंपन्या किमती कमी करून आपली विक्री वाढविण्याबरोबरच मार्केट शेअर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतील.