​Gudi Padwa 2017 : गुढी उभारु... नवचैतन्याची !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2017 07:39 AM2017-03-24T07:39:54+5:302017-03-24T13:09:54+5:30

नवचैतन्याला प्रेरक ठरणाऱ्या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणाऱ्या या सणानिमित्त नवचैतन्याची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करुया.

Gudi Padwa 2017: Gudi Padwa ... Navchaitanya's! | ​Gudi Padwa 2017 : गुढी उभारु... नवचैतन्याची !

​Gudi Padwa 2017 : गुढी उभारु... नवचैतन्याची !

Next
ong>-Ravindra More
नववर्षाचा पहिला दिवस म्हणून चैत्र प्रतिपदा साजरी केली जाते ती गुढी उभारुन. या दिवसाला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक दृष्टीने खूप महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून नवचैतन्याला प्रेरक ठरणाऱ्या, मरगळलेल्या, अनुत्साहित मनांना जागवणाऱ्या या सणानिमित्त नवचैतन्याची गुढी उभारुन नववर्षाचे स्वागत करुया.

गुढीपाडवा असा साजरा करावा
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची व परिसराची स्वच्छता करावी. अंगास सुवासिक तेल लावून अभ्यंगस्नान करावे. नवीन वस्त्रे परिधान करावीत. दरवाजासमोर रांगोळी काढावी. देवांची पूजा करावी. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण बांधावे. वेळूची (बांबूची) काठी घेऊन ती स्वच्छ धुवून तिच्या टोकाला तांबडे वस्त्र, फुलांची माळ, साखरपाकाची माळ घालून त्यावर एक लोटी उपडी ठेवावी. अशारितीने तयार केलेली गुढी, दारासमोर रांगोळी घालून उभी करावी. या गुढीस पूजा करून कडूनिंबाची कोवळी पाने घेऊन त्यात जिरे, मिरी, हिंग, सैंधव, मीठ व ओवा इत्यादी घालून ते मिश्रण चांगले वाटावे आणि घरातील सर्वांनी थोडे थोडे खावे. पंचपक्वान्नाचे भोजन करून तो दिवस आनंदात घालवावा. या दिवशी चांगल्या कामाचा शुभारंभ करावा.

नववर्षाच्या शुभारंभी येणारा पाडवा या साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या दिवशी व्यापारी, दुकानदार, कारखानदार, विक्रेते त्यांच्या कायार्चा शुभांरभ करतात. इमारतीची पायाभरणी, उद्घाटन, गृहप्रवेश अशी अनेक शुभकार्ये या मुहूर्तावर पार पडतात. विशेष म्हणजे या शुभमुहूर्तावर केलेले नवे संकल्प पूर्णत्वास जातात. 
गुढी म्हणजे नव्या वर्षाची, नव्या संकल्पांचीही सुरुवातच असते. गुढीसाठी वापरलेली आंब्याची किंवा कडूलिंबाची डहाळी म्हणजे जीवनधाराच मानली जाते. मांगल्याचं, हिरवाईचं, सृजनाचं ते प्रतीक, गुढीचं चांदीचं पात्र म्हणजे जीवनरस साठवून तो ग्रहण करण्याचं साधन, गुढीसाठी वापरलेलं रेशमी वस्त्र म्हणजे आपलं संरक्षण, आपली संस्कृती. गुढीवर लटकवलेली साखरेच्या गाठ्यांची माळ म्हणजे जीवनातल्या गोडीचं प्रतीक असते. गुढी उभारायची ती प्रात:काली! उतरवायची ती सूर्यास्तावेळी! 

गुढीपाडव्याच्या दिवशी कडूलिंबाचे फार महत्त्वाचे स्थान असते. दुधात कडूलिंबाची पाने कुस्करुन देवाला नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद म्हणून तो घ्यायचा. आयुर्वेदातलं कडूलिंबाचं महत्त्व जाणून केलेली ही योजना! आरोग्यदायी कडूलिंब वषार्रंभीच पोटात गेला तर रोगपरिहार होऊन जीवन झळाळून उठते. कडूलिंबाच्या पानांबरोबर हिंग, जिरे, मीठ, ओलं खोबरं वाटून तो गोळा खाण्याचीही प्रथा आहे. गुढीपाडव्याच्या गोड दिवशी कडू चवीचा कडूलिंब खाण्याचा हेतू एकच. वषार्रंभाची सुरुवात आरोग्यदायी! या दिवशी आनंद साजरा करण्यासाठी घरातील कुटुंबीय एकत्र बसून मिष्टान्नाचा आस्वाद घेतात. कोणत्याही शुभकायार्साठी मुहूर्तवेळ पाहताना पंचांगकत्र्यांनी सांगितलेले साडेतीन मुहूर्त विचारात घेतले जातात. त्या दिवशी संपूर्ण वेळ शुभघटिकाच असते.   

Web Title: Gudi Padwa 2017: Gudi Padwa ... Navchaitanya's!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.