गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2016 01:08 AM2016-01-16T01:08:41+5:302016-02-12T05:38:44+5:30

गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर... दरवर्षी डिसेंबर महिन्यात अनेक ऑनलाईन वेबसाईट्स आपला वर्षभराचा लेखाजोखा, टॉप १0 याद्या, कोण हीट, कोण मिस याची आकडेवारी जाहीर करतात. त्यानुसार, याहू सर्च इंजिनने केलेल्या सर्वेक्षणातून 'गाय' हा यावर्षी सर्वात जास्त चर्चिलेला विषय ठरला आहे.

The guy got the 'Personality of the Year' | गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर

गाय ठरली 'पर्सनालिटी ऑफ द ईअर

Next
वर्षी डिसेंबर महिन्यात अनेक ऑनलाईन वेबसाईट्स आपला वर्षभराचा लेखाजोखा, टॉप १0 याद्या, कोण हीट, कोण मिस याची आकडेवारी जाहीर करतात. त्यानुसार, याहू सर्च इंजिनने केलेल्या सर्वेक्षणातून 'गाय' हा यावर्षी सर्वात जास्त चर्चिलेला विषय ठरला आहे. भारतामध्ये गोमांस बंदी आणि असहिष्णूतेसंदर्भात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर गाय ही याहूवर सर्वात जास्त सर्च केली गेली. अनेक हायप्रोफाईल नावांना मागे टाकून गायीने यावर्षी बाजी मारली. या सगळ्याची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या गोमांस बंदी कायद्यापासून झाली. यावर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही व्यासपीठांवर जोरदार मतमतांतरे, वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यानंतर दादरी हत्याकांडामुळे गाय पुन्हा हॉट टॉपिक झाला. मग देशात असहिष्णूतेवरून लेखकांनी 'पुरस्कार वापसी' सुरू केली. 'याहू'ने २0१५ ईअर इन रिव्ह्युव (वायआयआर)मध्ये भारतातील टॉप ट्रेंन्डस जाहीर केले. यूर्जसने याहूवर सर्च केलेल्या गोष्टींवरून ही यादी बनविली आहे. बिहार आणि दिल्ली निवडणुकाबद्दलही जास्त माहिती सर्च करण्यात आली तर नितीशकुमार आणि अरविंद केजरीवाल हे टॉप न्यूजमेकर्स ठरले. नरेंद्र मोदीसुद्धा या यादीत वरच्या स्थानी आहेत.

Web Title: The guy got the 'Personality of the Year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.