व्हॉट्स अॅपवर बनावट एक्सल फाईल्सद्वारे हॅकिंगचा प्रयत्न !
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 04:08 PM2017-01-04T16:08:41+5:302017-01-04T16:09:52+5:30
व्हॉट्स अॅपवर बनावट एक्सल फाईल्स पाठवून यूजर्सची बॅँक अकाऊंटची माहिती हॅक करण्याचा प्रकार समोर आला असून, यूजर्सना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. व्हॉटस अॅपवर बऱ्याच लिंकमध्ये घातक ‘मालवेअर’ असतात.
Next
व हॉट्स अॅपवर बनावट एक्सल फाईल्स पाठवून यूजर्सची बॅँक अकाऊंटची माहिती हॅक करण्याचा प्रकार समोर आला असून, यूजर्सना सावधान राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
व्हॉटस अॅपवर बऱ्याच लिंकमध्ये घातक ‘मालवेअर’ असतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन हॅकर्सनी हुशारीने मायक्रोसॉफ्ट एक्सलच्या एका करप्ट फाईलच्या माध्यमातून माहिती चोरण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच ‘एनडीए’ आणि राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच ‘एनआयए’ कडून एखादी फाईल आली असावी अशा पध्दतीने बतावणी करुन ‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि NIA-selection-order-.xls’ या नावांनी दोन फाईल्स पाठविण्यात येतात. कुणालाही हा संदेश ‘एनडीए‘ अथवा ‘एनआयए’कडून आल्याचा भास होतो. यामुळे कुणीही यावर क्लिक करतो आणि तेथेच फसतो ! यावर क्लिक केल्यानंतर संबंधित युजरच्या स्मार्टफोनमधील त्याच्या बँकेच्या आॅनलाईन अकाऊंटसह पिन क्रमांक तसेच अन्य सर्व माहिती सुलभपणे चोरली जाते असे आढळून आले आहे.
यामुळे आपल्या व्हॉट्स अॅपवर‘NDA-ranked-8th-toughest-College-in-the-world-to-get-into.xls’ आणि NIA-selection-order-.xls’ अशा नावाने मायक्रोसॉफ्ट एक्सेल फाईल्स आल्यास त्या उघडू नये असे सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सुचविले आहे. काही यूजर्सला याच नावाने पीडीएफ फाईल्सही पाठविण्यात आल्या असून यावरही क्लिक न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.