हॉल सजवा आपला आपणच!

By admin | Published: April 7, 2017 07:19 PM2017-04-07T19:19:18+5:302017-04-07T19:19:18+5:30

जेव्हा आपला हॉल आपण आपल्या डोक्यातल्या कल्पनांना कामाला लावून आपल्या हातानं आणि मनानं सजवतो तेव्हा तो नुसताच देखणा नाहीतर जिवंत आणि बोलका होतो.

Hall decorate yourself! | हॉल सजवा आपला आपणच!

हॉल सजवा आपला आपणच!

Next

- सारिका पूरकर-गुजराथी.

माझ्यातल्या क्रिएटीव्हीटीचं कोणाला काय वाटतंच नाही असा चडफडाट लहानांपासून मोठयांपर्यंत अनेकजण करतात. पण आपल्यातल्या क्रिएटीव्हीटीची चाड कोणाला असो की नसो पण एका ठिकाणी या क्रिएटीव्हीटीची खरोखर गरज असते. पण ती हाक आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. अर्थात आपल्या घराचा दिवाणखाना म्हणजेच हॉल हो. ही एक अशी जागा आहे जिथे आपल्यातल्या क्रिएटीव्हीटीला भरपूर स्कोप असतो. आपलं घर आपल्याला एक व्यासपीठे मिळवून देतं असतं म्हणून ती संधी आपण का नाकारावी?
आपलं घर सजवण्याच्या विविध कल्पना आपण घरबसल्या लढवू शकतो आणि त्या लगेच करूनही बघू शकतो. यामुळे दोन फायदे होतात. एकतर आपल्यातल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आणि दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपलं घर सुंदर दिसतं.
घरात इतर कोणत्याही खोलीपेक्षा दिवाणखाण्याला (हॉलला) सजावटीची गरज असते. मग तो मोठा आहे की एकदम छोटा हा मुद्दा नसतोच. तो कसाही असो फक्त तो छान दिसायला हवा. बाहेरच्या वस्तू आणून घर सजवता येतं. पण आपल्या हाताला आणि डोक्याला कामाला लावलं तर तो आणखीनच छान दिसतो. घरातला हॉल आपल्या हातानं सजवण्याच्या अनेक युक्त्या आहेत.
१) सध्या फ्लोरल प्रिंट्सची चलती आहे. या फ्लोरल प्रिंट फेब्रिकचा वापर सोफ्यासाठी, हॉलमधील पडद्यांकरिता करू शकता. यामुळे हॉलला एकदम फ्रेश लूक मिळेल. यासाठी अट मात्र एकच की आपण निवडू ते फेब्रिक ब्राईट आणि सॉफ्ट लूक देणाऱ्या रंगाचं हवं. शक्यतो खूप मोठे प्रिंट्स वापरु नका.
२) हटके लूक हवा असेल तर स्ट्रिप्ड फेब्रिक बेस्ट आॅप्शन आहे. पडदे, रग, कुशन्स, सोफ्याचे कापड स्ट्रिप्ड प्रिंटचे वापरु शकता. याच्या रंगसंगतीवर मात्र विशेष लक्ष द्यावं लागेल. पॅरट ग्रीन सोफ्यासाठी, लाईट आॅरेंज आणि लाईम कुशन्ससाठी, लाइट रेड रगसाठी आणि पडद्यांसाठी मिडियम ग्रीन वापरुन पाहा. नक्कीच फ्रेश लूक मिळेल.
३) व्हायब्रंट लूकचा जमाना आहे हा, मग बैठक खोलीची सजावटही त्यास अपवाद नाही. एरवी बैठक खोलीतील टीव्ही स्टॅण्ड पारंपरिक वूड कलर फिनिशचेच असत, आपण मात्र त्यास व्हायब्रंट लूक देऊ शकता. हाय ग्लॉस बोल्ड कलर्सनं ही स्टॅण्ड, टेबल्स रंगवून टाका मग. त्यासाठी सॅण्ड पेपरनं ते आधी घासून घ्या. प्रायमरचा हात द्या नंतर रंग लावा.
४) घरातील छोटी कपाटं केबिन्स देखील निआॅन रंगात रंगवून त्यांनाही कलरफूल बनवता येतं.
५) बैठकीच्या खोलीत फ्लॉवरवासे नेहमीच अरेंज केले जातात. मात्र या वासेंचेही लूक बदलले पाहिजे ना आताच्या ट्वेन्टी-ट्वेन्टीच्या जमान्यात. त्यासाठी एकच मोठा वासे आणि त्यात फुलं ही टिपिकल रचना टाळा. त्याऐवजी क्लिअर ग्लास बॉटल्स (विविध आकाराच्या, उंचीच्या) घेऊन त्यात एक-एक, दोन-दोन मोठ्या दांडीचे फुले ठेवा. हा लूक एकदम वेगळा वाटतो.
६) गो नॅचरल हा मंत्रा सजावटीसाठीही वापरा. शंख, शिंपले, पेबल्स, झाडांच्या फांद्या, पानं यांचा कल्पकतेनं वापर करुन हॉल देखणा करता येतो.
७) बैठकीच्या खोलीत साइड टेबलवर आकर्षक लॅम्पशेडही तुमच्या खोलीच्या सजावटीत भर घालतो. त्यासाठी शक्यतो लॅम्पशेड पार्चमेंट, पांढऱ्या रंगात असेल तर बेस्टच. सध्या अनेक लॅम्पशेड्सचे प्रकार उपलब्ध आहेत, ते देखील ट्राय करायला हवेत.

 

Web Title: Hall decorate yourself!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.