​कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी ऐकवा हॅपी गाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2016 03:54 PM2016-08-30T15:54:56+5:302016-08-30T21:24:56+5:30

आनंदी संगीत ऐकल्यामुळे टीमवर्क वाढते.

Happiest songs to enhance cooperation in the workforce | ​कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी ऐकवा हॅपी गाणे

​कर्मचाऱ्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी ऐकवा हॅपी गाणे

Next
ंगीतामध्ये जादू असते’ असे म्हणतात. आवडीचे गाणे ऐकले की आपला मूड कसा एकदम फ्रेश होऊन जातो. विविध प्रकारच्या गाण्यांचा टीममध्ये काम करणाऱ्या सदस्यांच्या मूडवर कसा परिणाम होतो हे जाणून घेण्यासाठी अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील संशोधकांनी अध्ययन केले. त्यातून असे दिसून आले की, आनंदी संगीत ऐकल्यामुळे टीमवर्क वाढते.

संशोधकांनी केलेल्या प्रयोगात तीन तीन जणांचे गट करण्यात आले. त्यांना दिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रत्येक सदस्य कशा प्रकारे योगदान देतो याची नोंद ठेवण्यात आली. जेव्हा हॅपी-अपबीट संगीत वाजवले जायचे तेव्हा प्रत्येक सदस्य अधिक उत्सुकतेने टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे तर अप्रिय संगीत लावल्यावर मात्र सदस्यांचे योगदान कमी व्हायचे.

नोंदींच्या विश्लेषणानुसार आनंदी संगीताच्या वेळी सदस्यांचे योगदानाची तुलना अप्रिय संगीताच्या वेळच्या योगदानाशी केली असता ती एक तृत्यांश अधिक आढळून आली. जेव्हा कोणतेच संगीत ऐकवण्यात नाही आले तेव्हा देखील हे प्रमाण कायम राहिले. म्हणजे श्रवणीय संगीतामुळे कर्मचाºयांमध्ये सहकार्याची भावना वाढते.

मानवी वर्तुणूकीचे शास्त्रज्ञ केविन निफिन यांनी सांगितले की, आपल्या दैनंदिन जीवनाचा संगीत खूप महत्त्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संगीत आपल्या वर्तणूकीवर आणि पर्यायाने कार्यक्षमतेवर परिणाम करत असते.

Web Title: Happiest songs to enhance cooperation in the workforce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.