हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2016 02:26 AM2016-04-09T02:26:45+5:302016-04-08T19:26:45+5:30

जे. के. रोलिंग यांनी ज्या खुर्चीवर हॅरी पॉटर पुस्तेक लिहिली त्या खुर्चीला एका लिलावात सुमारे 2.6 कोटी रुपये किंमत मिळाली. 

Harry Potter auctioned for Rs 2.6 crores | हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव

हॅरी पॉटर लेखिकेच्या खुर्चीचा 2.6 कोटींमध्ये लिलाव

Next
ान आणि लेजेंडरी व्यक्तींच्या खाजगी गोष्टींबद्दल लोकांना प्रचंड आकर्षण असते. म्हणून तर त्यांनी वापरलेल्या छोट्या मोठ्या सर्वच गोष्टींना बाजारात असधारण किंमत आणि महत्त्व असते. आता हॅरी पॉटर लेखिकेचेच उदाहरण घ्या ना.

जे. के. रोलिंग यांनी ज्या खुर्चीवर बसून पहिल दोन हॅरी पॉटर पुस्तेक लिहिली त्या खुर्चीला एका लिलावात सुमारे 2.6 कोटी रुपये (3.94 लाख डॉलर्स) एवढी घसघशीत किंमत मिळाली. न्युयॉर्कमध्ये झालेल्या या लिलावात निनावी खाजगी संग्राहकाने ती खरेदी केली. 

स्कॉटलंड येथील एडिबर्ग शहरातील त्यांच्या फ्लॅटमध्ये असणाऱ्या चार खुर्च्यांपैकी ही एक खुर्ची आहे. ‘हॅरी पॉटर अँड द सॉर्सेर्स स्टोन’ आणि ‘हॅरी पॉटर अँउ चेंबर आॅफ सिक्रेट्स’ ही दोन पुस्कते रोलिंग यांनी या खुर्चीवर बसून लिहिली होती.

विके्रता जेराल्ड ग्रे यांनी सांगितले की, आमच्या अपेक्षापेक्षा खुप मोठी किंमत आम्हाला मिळाली. एकविसाव्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या साहित्यापैकी एका साहित्याच्या निर्मितीची ही खुर्ची साक्षीदार आहे. लिलावातून मिळालेल्या रकमेच्या दहा टक्के रक्कम मी जे. के. रोलिंगची चॅरिटी संस्था ल्युमॉसला देणार आहे.

Harry Potter Chair

यापूर्वी 2002 मध्ये रोलिंग यांनी स्वत: या खुर्चीचा लिलाव केला होता. तेव्हा तिला २१ हजार डॉलर्स किंमत मिळाली होती. त्यानंतर ई-बेवर करण्यात आलेल्या विक्रीमध्ये 29 हजार डॉलर्स किंमत मिळाली.

Web Title: Harry Potter auctioned for Rs 2.6 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.