फक्त ३२६७ रुपयांत त्याला मिळाले संपूर्ण आयलँड रिसॉर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2016 01:22 PM2016-07-30T13:22:16+5:302016-07-30T18:52:16+5:30
आॅस्ट्रेलियातील एक व्यक्ती केवळ ४९ डॉलर्सच्या (३२६७ रुपये) सोडत तिकीटावर मायक्रोनेशियन बेटावरील एका हायफाय रिसॉर्टचा मालक झाला आहे.
Next
न ळ्याशार समुद्रातील एका निसर्गरम्य बेटावर सर्व सुखसुविधांनी सज्ज रिसॉर्टमध्ये सुटी घालवायला कोणाला आवडणार नाही. आणि जर ते रिसॉर्टच आपण विकत घेऊ शकलो तर? पण असे रिसॉर्ट विकत घ्यायचे म्हणजे एवढे पैसे आणायचे कुठून? पण जर नशिबातच लिहिले असेल तर काय?
आॅस्ट्रेलियातील एक व्यक्ती केवळ ४९ डॉलर्सच्या (३२६७ रुपये) सोडत तिकीटावर मायक्रोनेशियन बेटावरील एका हायफाय रिसॉर्टचा मालक झाला आहे. विशेष म्हणजे या रिसॉर्टमध्ये एक रात्र थांबायचे तर यापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
सोळा रुमचे कोसराई नौटिलस रिसॉटचे मालक डग व सॅली बेट्झ या वृद्ध जोडप्याने आॅस्ट्रेलियामध्ये आपल्या नातवंडांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीने जो जास्त किंमत देईल त्याला रिसॉर्ट विक्री करण्याऐवजी या जोडप्याने अनोखी पद्धत वापरण्याची शक्कल लढवली. सोडत काढून ज्याचे नाव येईल त्याला ते विकण्याची अनोखी घोषणा त्यांनी केली.
दोन दशकांपासून या रिसॉर्टचे मालक असलेले बेट्झ दाम्पत्याने फेसबुक पेजवर पोस्ट केले की, नफा कमावण्याऐवजी आम्ही अशा व्यक्तीला रिसॉर्ट देऊ इच्छितो ज्याला या बेटांविषयी प्रेम आणि आस्था असेल. केवळ धानाढ्यांना आम्हाला विकायचे नाही. आम्ही आमच्या आयुष्यात खूप समाधानी आहोत. गेली वीस वर्षे या बेटांवर राहताना आलेले अनुभव कधीच विसरू शकणार नाही. आता मात्र आम्हाला आजी-आजोबाच्या भूमिकेतच राहायचे आहे.