​...आता हेडफोनही होणार हॅक!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2016 11:31 AM2016-12-03T11:31:33+5:302016-12-03T11:31:33+5:30

मोबाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे.

Headphone will be hacked now! | ​...आता हेडफोनही होणार हॅक!

​...आता हेडफोनही होणार हॅक!

Next
बाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. 
एका रिपोर्टनुसार हेडफोन हॅक होण्यासंदर्भात खुलासा इस्त्राईलच्या बेन ग्युरिओन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केला आहे. या रिपोर्टमध्ये कशा प्रकारे तुमचे हेडफोन हॅक करून हॅकर्स तुमचं बोलणं ऐकू शकतात, याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हेडफोन कॉम्प्युटरला कनेक्ट नसतानाही हॅकर्स तुमची बातचीत ऐकू शकणार आहेत. संशोधकांच्या मते, मालवेयरच्या माध्यमातून हेडफोनमधील मायक्रोफोनला बदलून त्याद्वारे तुमची बातचीतही हॅकर्सच्या माध्यमातून रेकॉर्ड केली जाऊ शकते. 
हॅकर्स पहिल्यांदा मालवेयरच्या माध्यमातून इअरबर्डमध्ये लागलेल्या स्पीकरला मायक्रोफोनशी जोडतील. त्यानंतर हेडफोन हॅक करून पूर्ण खोलीत सुरू असलेलं संभाषण ते ऐकू शकतील.
 इस्त्राईली संशोधकांनी कॉम्प्युटरमधील आॅडिओ कोडॅक चिपसेट रिअलटेक आॅडियोलाही हॅक केलं आहे. आॅडिओ चिप हॅक झाल्यानंतर इनपूट आणि आऊटपूटला स्वीच करण्यात येते आणि त्यानंतर हेडफोनचे इनपूट डिवाइस काम करू लागते. हेडफोनमध्ये इनबिल्ट मायक्रोफोन असल्यास हॅकर्सचं काम सोपं होणार आहे. मात्र मायक्रोफोन नसले तरी हॅकर्स हेडफोन हॅक करू शकतील.

Web Title: Headphone will be hacked now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.