​घरबसल्या झटपट इंग्रजी शिकण्यासाठी या वेबसाइट्स करतील मदत !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2017 08:41 AM2017-06-03T08:41:19+5:302017-06-03T14:11:19+5:30

आपणास प्रगती करायची असेल मात्र इंग्रजी येत नसेल, तर आता चिंता करु नका. आपण घरबसल्या इंग्रजी भाषा शिकू शकता.

Helping these websites will help you learn English instantly! | ​घरबसल्या झटपट इंग्रजी शिकण्यासाठी या वेबसाइट्स करतील मदत !

​घरबसल्या झटपट इंग्रजी शिकण्यासाठी या वेबसाइट्स करतील मदत !

googlenewsNext
करी असो की व्यवसाय किंवा शिक्षण घेत असाल,आपल्याला उत्कृष्ट इंग्रजी येणे आवश्यक आहे. कारण इंग्रजी जागतिक भाषा आहे. विशेष म्हणजे नोकरीत बडती घ्यायची असेल किंवा उच्चशिक्षण घ्यायचे असेल तर इंग्रजी भाषेची गरज भासतेच. ज्यांना इंग्रजी भाषा येत नाही त्यांची प्रगती थांबलेली दिसून आली आहे. आपणास प्रगती करायची असेल मात्र इंग्रजी येत नसेल, तर आता चिंता करु नका. आम्ही आपणास काही वेबसाइट्सची माहिती देत आहोत, ज्याद्वारे आपण घरबसल्या इंग्रजी भाषा शिकू शकता.

* How do you do?
इंग्रजीमध्ये संभाषण व्हावे या दृष्टीकोनातून हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून आपण याद्वारे स्काइपद्वारे दुसऱ्यासोबत संभाषण करुन इंग्रजी शिकू शकता. यामुळे ज्यांना इंग्रजी शिकण्याची इच्छा आहे अशा आपल्या व्यक्तींसोबत संभाषण करू शकता  

* MyEnglishTeacher.eu
या वेबसाइटवर आपणास इंग्रजी शिकण्यासाठीच्या वेगवेगळ्या टिप्स, संकेतस्थळे आणि बऱ्याच प्रमाणात साहित्य मिळेल. या वेबसाइटला भेट देऊन व्यवस्थित सराव केल्यास आपण सहज इंग्रजी शिकू शकता. विशेष म्हणजे आपल्या इ-मेल आयडीवरही इंग्रजी शिकण्याच्या टिप्स मिळवू शकता. 

* Holmwoods
घरबसल्या अगदी आरामाने इंग्रजी शिकण्यासाठी हे संकेतस्थळ उपयुक्त आहे. याठिकाणी वाचण्यासाठी, ऐकण्यासाठीचे भरपूर साहित्य उपलब्ध आहे. सरावसाठी बरीच उदाहरणेही दिली आहेत. 

*  PhraseMix
या वेबसाइटचे वैशिट्य म्हणजे एकदम रोचक पध्दतीने इंग्रजी शिकवणे होय. संपूर्ण संभाषण इंग्रजीमधून करण्याच्या दृष्टीकोनातून हे संकेतस्थळ तयार केले आहे. या ठिकाणी फ्रेजला नव्या पध्दतीने सांगितले आहे. जास्तीचे शब्द न वापरता तुम्ही फ्रेजद्वारे तुमचे म्हणणे समोरच्यापर्यंत पोहचवू शकता. 

* Voice of America
या वेबसाइटवर  व्यापार, आरोग्य, इंटरनेट आणि विज्ञान यांच्या माहितीच्या आधारे अमेरीकन इंग्रजी शिकवली जाते.

Web Title: Helping these websites will help you learn English instantly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.