तरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 06:27 AM2018-03-30T06:27:25+5:302018-03-30T11:57:25+5:30

फॅशन ट्रेंड्सना फॉलो करणं आणि त्या ट्रेंड्स सोबत स्वतः तयार होणं हे प्रत्येकाला आवडतं. सध्या ट्रेंड्स ना फॉलो करणाऱ्यांना "फॅशन सेन्स" आहे असेही संबोधले जाते. आधुनिक काळात वेळ आणि काळानुसार ही फॅशन बदलत असते

The hit of the youth is the 60th Floral Print's Fashion | तरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन

तरुणांमध्ये हिट होतेय 60's फ्लोरल प्रिंटची फॅशन

googlenewsNext
शन ट्रेंड्सना फॉलो करणं आणि त्या ट्रेंड्स सोबत स्वतः तयार होणं हे प्रत्येकाला आवडतं. सध्या ट्रेंड्स ना फॉलो करणाऱ्यांना "फॅशन सेन्स" आहे असेही संबोधले जाते. आधुनिक काळात वेळ आणि काळानुसार ही फॅशन बदलत असते. प्रत्येकाची आवड, गरज आणि पैशांच्या स्वरूपाप्रमाणे फॅशनची व्याख्या बदलत जाते. कुठलाही ट्रेंड फॉलो करतेवेळी आपण त्यावेळी बाजारात चालत असलेल्या डिझाइन्सचा जास्तीत जास्त वापर करतो. या ट्रेंडमध्ये ओल्ड फॅशन किंवा फंकी लूक असं नसतं. आता तरुण पिढी सोशल मीडियाच्या साहाय्याने फॅशन ट्रेंड्स बद्दल अपडेट ठेवत असतात व ते फॅशन ट्रेंड्स खूप चांगल्या पद्धतीने कॅरीदेखील करत आहेत. मागील 5 ते 10 वर्षात फॅशनची व्याख्या मोठ्या प्रमाणात बदलली आहे. हीच पूर्वीची फॅशन परत येताना आता दिसत आहे. ६० व्या दशकात फ्लोरल प्रिंटची फॅशन तरुणांमध्ये "हिट' ठरली होती आणि आता तीच फॅशन परत येताना दिसत आहे. फॅशन ब्रॅंड्समध्ये सर्वात अव्व्ल असलेल्या "लिवा" ने हीच स्टाईल खास फॅशनप्रेमींसाठी नव्या रूपात आणली आहे. नक्की काय आहे या डिझाईन्स मध्ये याचा आढावा घेऊया ...
 
ब्राईट शेड्स : फ्लोरल प्रिंट ही गडद रंगाच्या कपड्यावर अधिक खुलून दिसते, ६० च्या दशकांमधील हाच लूक सर्वात आकर्षक ठरत असेल. सध्या पिवळा, ऑफ व्हाईट रंगांच्या कपड्यांमध्ये केलेले नक्षीकामाचे डिझाईन्स "इन" आहेत .
 
निवड : "लिवा" खासियतच ही आहे कि यामध्ये तयार होणारे कपडे कोणत्याही व्यक्तीला उठावदार दिसतील. आपल्याला आपली उंची आणि शरीरयष्टीनुसार योग्य त्या डिझाईन्सची निवड करणे आवश्यक आहे. या फ्लोरल प्रिंट डिझाईन्स मध्ये काहीसा "रेट्रो" टच असल्याचे आपल्याला जाणवेल.
 
मल्टिपल आऊटफिट्सचा समावेश : पूर्वी फक्त "वन पीस" किंवा "फ्रॉक" पेक्षा थ्री पीस किंवा जॅकेट्सना विशेष पसंती होती. फिक्कट रंगाच्या टॉपवर फ्लोरल जॅकेट आपल्याला स्टायलिश लूक देऊन जातो.

वेगवेगळ्या प्रिंट्सचे एकत्रीकरण : ६०व्या दशकात फ्लोरल प्रिंटसोबत बॉक्स, चेक्स आणि रेषा रेषांचे प्रिंट्स सुद्धा चर्चेत होते. आता फ्लोरल प्रिंट्ससोबत या प्रिंट्सचा देखील विशेष समावेश केलेला आहे. पार्टी किंवा एखाद्या स्पेशल ओकेजनमध्ये अशा प्रिंटचे कपडे आकर्षित करणारे आहेत.
 
फ्लुइड फॅशन : फ्लोरल प्रिंट्समध्ये आपल्याला कम्फर्टेबल अशाच कपड्यांचा वापर करण्यात यायचा. यामध्ये सिल्क आणि हलक्या वजनांच्या कापडाचा विशेषतः समावेश असायचा. "लिवा" हे नैसर्गिकरित्या तयार केलेले व्हिसकोस कापड या डिझाईन्समध्ये खासकरून वापरले जाते, जेणेकरून या कपड्यांमध्ये आपण अधिक कम्फर्टेबल आणि कॉन्फिडन्ट राहू .
 

असं म्हणतात की आपण वेळेनुसार आपली फॅशन बदलत असतो पण "लिवा" मुळे पूर्वी फेमस असलेली ड्रेसिंग स्टाईल आणि डिझाईन्स आपल्याला नव्याने "रेट्रो लाईफस्टाईल" मध्ये अनुभवायला मिळत आहे.

Web Title: The hit of the youth is the 60th Floral Print's Fashion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.