फेसबुकवर ‘हॉलिडे कार्ड’ची सुविधा !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2016 03:31 PM2016-12-22T15:31:15+5:302016-12-22T15:31:15+5:30
प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जातात. प्रत्येकाला वाटते की, तेथील प्रसंग सोशल मीडियाद्वारे प्रसारित व्हावा. यासाठी फेसबुक या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी ‘हॉलिडे कार्ड’ तसेच विविध कार्यक्रमांसाठीचे विशेष ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधा दिली आहे.
Next
प रत्येकजण कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला जातात. प्रत्येकाला वाटते की, तेथील प्रसंग सोशल मीडियाद्वारे प्रसारित व्हावा. यासाठी फेसबुक या प्रभावी माध्यमाचा वापर केला जातो. हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी ‘हॉलिडे कार्ड’ तसेच विविध कार्यक्रमांसाठीचे विशेष ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधा दिली आहे.
सध्या सर्वत्र ख्रिसमसमुळे सुटीचे चैतन्यदायी वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर फेसबुकने आपल्या यूजर्ससाठी हॉलिडे कार्ड पोस्ट करण्याची सुविधा प्रदान करण्याची घोषणा केली आहे. सध्या यूजर्सला त्यांच्या न्यूज फिडच्या वरील बाजूस हे कार्ड दिसत आहेत. या १८ कार्डपैकी यूजर त्याला हवे असणारे कार्ड शेअर करू शकतो. अर्थात कुणाला हे कार्ड वैयक्तिकरित्या पाठवता येत नसून, संबंधित यूजर हा त्याच्या वॉलवरच पोस्ट करू शकणार आहे.
याशिवाय फेसबुकने आपल्या वापरकर्त्यांसाठी वेगवेगळ्या इव्हेंटस्साठी ‘मोमेंटस्’ शेअर करण्याची सुविधादेखील प्रदान केली आहे. यामुळे एखाद्या कार्यक्रमाशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळू शकते.