कसे हटवाल ‘ट्रूकॉलर’मधून आपले डिटेल्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2016 05:22 PM2016-10-18T17:22:31+5:302016-10-18T17:22:31+5:30
गूगल प्ले स्टोअरवर असे बरेच अॅप्स आहेत, की ज्यांच्याद्वारे कोणाचीही संपूर्ण माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.
Next
अगोदर ट्रूकॉलर काय आहे हे जाणून घेऊया. हे अॅप गूगल प्ले स्टोरवर मोफत उपलब्ध आहे. याची साईज 8.6 एमबी असून आतापर्यंत प्ले स्टोर वरुन याला 50 करोड़ पेक्षाही जास्तवेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे. हे अॅप अॅण्ड्रॉईड 4.0.3 किंवा यापेक्षा अधिकचे व्हर्जनवरदेखील काम करते. त्यात खालील फिचर्स अॅड आहेत.
- कोणत्याही नंबरच्या बाबतीत डिटेल्स जमा करणे
- एखाद्या कॉलर्सला किंवा टेलिमेकर्सला ब्लॉक करणे
- अॅपद्वारे डायरेक्ट कॉल करणे
ट्रूकॉलरमधून नंबर हटविण्याची प्रोसेस-
या अॅपमधून आपला नंबर हटविण्यासाठी यूजरला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की, तो स्वत:देखील या अॅपचा वापर करु शकत नाही. सोबतच आपल्या स्मार्टफोनवरून या अॅपच्या मदतीने कोणत्याही यूजरचे डिटेल्सदेखील मागवू शकत नाही.
हे अॅप अन्य सोशल मीडिया जसे की, फेसबुक, व्हॉट्स अॅप किंवा अन्य मीडियावर असलेली आपल्या नंबरशी संबंधित माहिती ट्रॅक करतो. कारण प्रत्येक ठिकाणी आपण आपली डिटेल्स देत असतो.
अॅण्ड्रॉईड यूजर्स ट्रूकॉलरच्या मेनू बार मध्ये जाऊन अकॉऊंट डिअॅक्टीव्ह करुन आपली डिटेल्स हटवू शकता किंवा ट्रूकॉलरच्या वेबसाइटवरुनही आपला नंबर आणि डिटेल्स रिमूव्ह करू शकता. यासाठी यूजर्सला ट्रूकॉलरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपला मोबाईल नंबर संबंधित बॉक्स मध्ये टाकून व्हेरिफिकेशन कॅप्चाला फॉलो करावे. त्यानंतर आपला नंबर अनलिस्ट करावा. यानंतर ट्रूकॉलरतर्फे मेसेज येईल, की आपली रिक्वेस्ट मिळाल्यापासून २४ तासानंतर आपली डिटेल्स हटविण्यात येईल.