प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2018 03:17 PM2018-09-01T15:17:11+5:302018-09-01T15:19:13+5:30

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती.

how to hide baby bump after 3 to 4 months of pregnancy see neha dhupia pics | प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स! 

प्रेग्नन्सीमध्ये स्टायलिश लूकने लपवा बेबी बम्प; नेहा धूपियाकडून घेऊ शकता फॅशन टिप्स! 

Next

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया तिच्या बेबी बम्पमुळे चर्चेचा विषय ठरली होती. नेहाने मे 2018 रोजी अंगद बेदी सोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यांतच नेहा बेबी बम्पसोबत दिसल्याने ती चर्चेचा विषय ठरली होती. पण स्वतः नेहाने या चर्चांना पूर्णविराम देत आता स्वतःच्या प्रेग्नन्सीची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नेहाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे.

नेहाने ऑफिशिअली प्रेग्नन्सीबाबत सांगण्याआधी ती लॅक्मे फॅशन वीक 2018मध्ये पति अंगद बेदीसोबत रॅम्प वॉक करताना दिसली होती. दोघांनी डिझायनर पायल सिंघलचं कलेक्शन प्रमोट करण्यासाठी रॅम्पबॉक केलं होतं. यावेळीही नेहाने कॉन्फिडंटली बेबी बम्पसह रॅम्प वॉक केलं होतं.

प्रेग्नन्सीची न्यूज सर्वांसोबत शेअर करण्याआधी तिने आपल्या स्टायलिश अंदाजाने बेबी बम्प सर्वापासून लपवण्याचा प्रय़त्न केला होता. नेहाच्याच काही इन्स्टाग्राम पोस्ट पाहून तुम्हीही तिच्याप्रमाणे प्रेग्नन्सीमध्ये फॅशन फंडा यूज करू शकता. 

ऑगस्ट महिन्यामध्ये पति अंगदसोबत सुट्टी घालवत असलेल्या नेहाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केला होता. यामध्ये नेहाने प्रिंटेड ड्रेस घातला असून तो फार लूज आहे. ज्यामुळे तिचा बेबी बम्प दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी नेहाने आणखी एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये यलो ड्रेसमध्ये नेहा स्टायलिश दिसत होती. 

लूज टॉप आणि मोठी बॅग हा लूक प्रेग्नन्सीमध्ये ट्राय करण्यासाठी परफेक्ट आहे. हा लूक तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 

प्रेग्नन्सीची न्यूज पब्लिक करण्याच्या एक दिवस अगोदर नेहा एका मोबाईल कंपनीला प्रमोट करताना दिसून आली. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये नेहा स्टायलिश पद्धतीने बेबी बम्प लपवताना दिसली. 

Web Title: how to hide baby bump after 3 to 4 months of pregnancy see neha dhupia pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.