इयररिंग्ज, ब्रेसलेट, बँगल्स, नेकलेस ठेवायचे कसे?

By admin | Published: April 6, 2017 09:21 PM2017-04-06T21:21:57+5:302017-04-06T21:21:57+5:30

हव्या त्या वेळेला पाहिजे ते सापडणारच नसेल तर मग कानातल्याचे, गळ्यातल्याचे भरमसाठ जोड असून काय उपयोग?

How to keep earrings, bracelets, bangles, necklace? | इयररिंग्ज, ब्रेसलेट, बँगल्स, नेकलेस ठेवायचे कसे?

इयररिंग्ज, ब्रेसलेट, बँगल्स, नेकलेस ठेवायचे कसे?

Next

 हव्या त्या वेळेला पाहिजे ते सापडणारच नसेल तर मग कानातल्याचे, गळ्यातल्याचे भरमसाठ जोड असून काय उपयोग? ज्वेलरी कुठेही आणि कशातही कोंबून ठेवण्यापेक्षा ती व्यवस्थित ठेवण्याचे अनेक आकर्षक पर्याय आपण आपल्या हातानं बनवू शकतो. घाईच्या वेळेत बायकांना, कॉलेज गलर््सला कधीही वेळेवर न सापडणारी गोष्ट म्हणजे सेफ्टी पिन आणि इअर रिंंगचे स्क्रूज. ज्वेलरी बॉक्स आणा नाही तर पर्समध्ये ठेवा याबाबतीत जो गोंधळ उडायचा तो उडतोच. मग शोधाशोध करण्यात वेळ जातो. चिडचिड होते. घालायचं काही विशेष असतं पण ते भेटत नसल्यानं वेगळंच काहीतरी घालून जावं लागतं. या गडबडीत तयारी करण्यातला वेळ जातो. हवं तसं तयार होवून जाता येत नाही. याचसाठी आापल्याकडे नुसती भरपूर ज्वेलरी असून चालत नाही तर ती ज्वेलरी वेल आॅर्गनाईज्ड असेल तर मग पाहिजे तेव्हा हवी असलेली वस्तू मिळते. आणि पळापळ टळते. आपल्याकडचे दागिने नीटनेटके ठेवण्यासाठी स्वस्तात मस्त असे अनेक उपाय करता येतात. १) शिवणकामासाठी जे दोऱ्यांचे रीळ वापरतात, त्यातील मोठया आकाराचे रिकामे झालेले रीळ घ्या. एका हार्डबोर्डच्या चौकोनी तुकड्यावर घरातील ब्लाऊजपीसचे, ड्रेस शिवून उरलेले कापड लावून घ्या. त्यावर हे रीळ फेविकॉलनं चिकटवून टाका. एका चौकोनी तुकड्यावर मधून मधून असे सात ते आठ रीळ बसवा. यावर नेकलेस, पेण्डट सेटची चेन, नुसती चेन, ब्रेसलेट, कडा, बांगड्या सहज अडकवता येतात. २)स्वयंपाकघरातली चार बाजूंची किसनी (फोर साईड ग्रेटर ) सुद्धा ज्वेलरी आॅर्गनाईज करायला मदत करु शकते. किसनीला आपल्या आवडीचा रंग देऊन घ्या. आणि तिच्या भोकांमध्ये तुमचे झुमके, डॅँगलर्स अडकवा. ३) दोन लाकडी फळ्या किंवा प्यायवूडचे आयताकृती तुकडे घेऊन त्यांना बिजागरी ठोकून जोडून घ्या. आवडीचा रंग द्या. आणि यावर काही हूक अडकवून घ्या. या हूकवर बांगड्या, कानातले, नेकलेस, ब्रेसलेट सहज अडकवू शकता. तुम्ही ही ट्रिक तुमच्या कपाटाच्या (वूडन फर्निचर) दरवाजच्या आतील भागावरही वापरु शकता. ४) टेराकोटा कुंडी आणि प्लेट्स रंगवून त्या आधी कुंडी, त्यावर प्लेट (खोल भाग वरच्या बाजूला) असे तीन थरात चिकटवून अनोखा ज्वेलरी स्टॅण्ड तयार होवू शकतो. ५) लहान मुलांसाठी बाजारात प्लॅस्टिकचे लहान आकारातील प्राणी मिळतात, ते सुद्धा ज्वेलरी आॅरगानाइज करण्याकामी वापरू शकता. यासाठी प्लॅस्टिकचा हत्ती, जिराफ असे प्राणी मधोमध कापून घ्या, ते सहज कापले जातात. त्यांना पांढऱ्या रंगात रंगवून घ्या. एक प्लायवूडचा आयताकृती (२२ इंच लाब व ५ इंच रुंद) तुकडा घेऊन त्यालाही पांढरा रंग द्या. आता रंगवलेले प्राणी ठराविक अंतरावर प्लायवर चिकटवा. या प्राण्यांच्या पाठीवर, सोंडेवर नेकलेस, बांगड्या अडकवता येतात. ६) एखाद्या काठीचा तुकडा घेऊन तिला आकर्षक रंगात रंगवा, हूक अडकवा आणि भिंतीवर टांगा. हूकवर तुम्ही ज्वेलरी अडकवू शकता. ७) सॉफ्टड्रिंकच्या बॉटल्स, टिश्यू पेपर रोलचा रीळ बांगड्या ठेवण्यासाठी वापरता येतो. -सारिका पूरकर-गुजराथी.

Web Title: How to keep earrings, bracelets, bangles, necklace?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.