या फोटोत किती मुली?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2016 01:17 AM2016-03-20T01:17:15+5:302016-03-19T18:17:15+5:30

इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर लगेचच व्हायरल झाला. 

How many girls in this photo? | या फोटोत किती मुली?

या फोटोत किती मुली?

googlenewsNext
्या एक फोटो इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वित्झर्लंडच्या फोटोग्राफर तिजीयाना वर्गरी यांनी हा फोटो क्लिक केला आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केल्यानंतर लगेचच व्हायरल झाला.

महत्त्वाचे म्हणजे एका आठवड्यातच सुमारे 15 हजारांपेक्षा जास्त नेटीझन्सनी हा फोटो शेअर केला. फक्त शेअरच नाही काहींनी या फोटोवर कमेंट्सही पोस्ट केले. काहींचे म्हणणे आहे की, या फोटोत दोन मुली आहेत, तर काहींचे उत्तरे 4, 5 अशी आहेत.

काही नेटीझन्सनी तर 13 मुली असल्याचेही सांगितले. पण प्रत्यक्षात या फोटोत केवळ दोनच मुली आहेत. आॅप्टिकल इल्यूजनमुळे 2 मुलींची संख्या 13 दिसत आहे. फोटो दोन्ही मुली आरशासमोर बसल्या आहेत. त्यांचे प्रतिबिंब आरशात दिसत आहे. त्यामुळेच त्यांची संख्या जास्त वाटत आहे. प्रत्यक्षाच फक्त दोनच मुली आहेत.

फोटोमधील मुली या मिस वर्गरी यांच्या मुली असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: How many girls in this photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.